Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:50 IST2025-11-12T13:49:38+5:302025-11-12T13:50:14+5:30
Sangli Crime News : काल रात्री उशीरा सांगलीत दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची हत्या झाली.

Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
Sangli Crime News : सांगली शहरातील गारपीर चौकात मध्यरात्री दलित महासंघाच्या उत्तम मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या केल्याची घटना समोर आली. मोहिते यांचा काल वाढदिवस होता, त्यांच्या वाढदिवसादिवशीच हत्या झाली. मोहिते यांच्या घराजवळच वाढदिवसासाठी मंडप होता. उत्तम मोहिते यांच्यावर शाहरुख शेख याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील गारपीर चौकात शाहरुख शेख आणि उत्तम मोहिते यांच्या मागील अनेक वर्षांपासून वर्चस्वावरुन वाद सुरू होते. अनेकवेळा या दोघांमध्ये वाद होत होते. काल मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. यासाठी त्यांच्या घरासमोर मांडव घातला होता. शहरातील अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. वाढदिवसाची गडबड संपली. सगळा कार्यक्रम संपल्यानंतर उत्तम मोहिते घरामध्ये जाणार होते, एवढ्यात काही हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्ला झाल्याचे लक्षात येताच उत्तम मोहिते यांनी घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण, दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या दगडामुळे दरवाजा पूर्ण बंद झाला नाही. यामुळे हल्लेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला आणि मोहिते यांच्यावर शाहरुख शेख याने सपासप वार केले. या हल्ल्यात मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी हल्लेखोर शाहरुख शेख याचाही मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तम मोहिते यांच्या घरात सीसीटीव्ही आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
हत्येमागील कारण आले समोर
उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख यांच्यात वर्चस्वावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. मोहिते हे सामाजिक क्षेत्रात काम करत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक विषयांवरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले, शेख आणि मोहिते यांच्या अनेकवेळा वाद झाले होते.