Sangli: म्हैसाळ नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:13 IST2025-06-27T17:12:40+5:302025-06-27T17:13:07+5:30

म्हैसाळ/ मिरज : म्हैसाळ येथे कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या नवीन बॅरेजच्या बांधकामस्थळी एका महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. २६) आढळून ...

Sangli: Body of missing woman found in Mhaisal riverbed | Sangli: म्हैसाळ नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह 

Sangli: म्हैसाळ नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह 

म्हैसाळ/ मिरज : म्हैसाळ येथे कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या नवीन बॅरेजच्या बांधकामस्थळी एका महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. २६) आढळून आला. दीपाली अमित खांडेकर (३५, रा. मालगाव, ता. मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत दीपाली खांडेकर यांची बेपत्ता झाल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होती.

पोलिसपाटील महादेव सपकाळ यांना नदीपात्रात एक मृतदेह दिसल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेह मिळाल्यानंतर पतीला बोलावून मृतदेहाची ओळख पटली असल्याची माहिती बीट अंमलदार बळीराम पवार यांनी दिली.

या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, अधिक तपास मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत.

Web Title: Sangli: Body of missing woman found in Mhaisal riverbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.