शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

संदीप मोहिते याच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:50 IST

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील महारयत कंपनीचा संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे ...

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील महारयत कंपनीचा संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आणखी चार दिवसांची वाढ केली. सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोहिते याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. त्याच्याकडील दोन महागड्या मोटारी पथकाने जप्त केल्या.महारयत कंपनीकडून कडकनाथच्या घोटाळ्यात राज्यासह परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातूनच रयत अ‍ॅग्रो आणि महारयत अ‍ॅग्रो या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हा गंडा घालणाºया सुधीर मोहिते, संदीप मोहिते आणि इतर चौघांविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला.या फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी संदीप मोहिते याला त्वरित अटक केली. तेव्हापासून तो गेले ११ दिवस पोलीस कोठडीत आहे. त्याचा दुसरा साथीदार हणमंत जगदाळे हासुद्धा पोलिसांच्या कोठडीत आहे. संदीप मोहिते याच्या कोठडीची मुदत बुधवारी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि संदीप मोहिते त्यातील मुख्य संचालक असल्याने त्याच्याकडे कसून तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील रणजित पाटील यांनी केली. त्यावर न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत मोहिते याच्या कोठडीत वाढ केली. दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संदीप मोहितेकडून दोन महागड्या मोटारी जप्त केल्याआहेत.