शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

खानापुरात चालते, सांगलीत का नाही ?

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

मदन पाटील यांचा सवाल : पतंगरावांना अप्रत्यक्ष टोला

सांगली : खानापूर बाजार समितीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आघाडी झाली. तिथे परिवर्तनाची नांदी नाही का? खानापुरात चालते, मग सांगलीत का नाही? राजकारणात सगळ्या गोष्टी होतच असतात, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांनी सोमवारी आ. पतंगराव कदम यांना लगावला. आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मदन पाटील यांनी सोमवारी महापालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाजार समिती निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांनी केले होते. त्याबाबत मदन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, खानापूर बाजार समितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना एकत्र लढली. तिथे त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. खानापुरातील राजकारणात परिवर्तन झाले नाही का? तिथे सगळे चालते, मग इकडे का नाही. नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुका पक्षीय पातळीवर योग्य आहेत. कुणाला पटो अथवा न पटो, मला जे पटले ते मी केले. निवडणुकीत माझ्यावर टीका झाली, पण मी खोलात गेलो असतो तर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले असते. आ. जयंत पाटील यांच्याशी सूर जुळल्यानंतरही त्यांनी ड्रेनेजबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे निदर्शनास आणून देताच मदन पाटील म्हणाले की, त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा आहे. ते महापालिकेत विरोधक आहेत. आमच्या पक्षातील लोकांना आमची काळजी नाही. एकतरी नेता महापालिकेच्या समस्या घेऊन शासनाकडे गेला आहे का? केवळ येथेच बसून ते आमच्यावर टीका-टिप्पणी करतात. आमदार, खासदार काय करतात? राज्यातील भाजप शासन विविध योजना विदर्भातच नेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय केला जात आहे. अन्न सुरक्षा व्यवस्था, दुष्काळाचे लाभ विदर्भातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आहे का नाही? येथील आमदार, खासदार काय करीत आहेत, असा सवालही मदन पाटील यांनी केला. टोल वसुली न पटणारी सांगलीत टोल वसुली पुन्हा सुरू होणार नाही. बांधकाम खात्याने टोलबाबत प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. १ कोटी २० लाखांसाठी सोळा वर्षे वसुलीचा ठेका कोणालाही न पटणारा आहे. शासनाने कित्येक कोटींचे टोलनाके बंद केले. त्यामुळे सांगलीचा प्रश्न शासनाच्यादृष्टीने तितका गंभीर नाही. ठेकेदाराला पैसे देऊन हा विषय संपविता येईल, पण या प्रकरणात काहीजण ‘मॅनेज’ होत आहेत, हे खरे दुर्दैव आहे, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.