इस्लामपुरात रोडरोमिओेंच्या ‘बंदोबस्ता’चे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:06+5:302021-03-07T04:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील महाविद्यालये, खासगी क्लासेस, अभ्यासिका, मुलींची वसतिगृहे आदी परिसरात दुचाकीवरून हिंडणाऱ्या रोडरोमिओंचा वावर वाढला ...

Rodrचेguez's 'settlement' challenge in Islampur | इस्लामपुरात रोडरोमिओेंच्या ‘बंदोबस्ता’चे आव्हान

इस्लामपुरात रोडरोमिओेंच्या ‘बंदोबस्ता’चे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील महाविद्यालये, खासगी क्लासेस, अभ्यासिका, मुलींची वसतिगृहे आदी परिसरात दुचाकीवरून हिंडणाऱ्या रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. यांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

इस्लामपूर शहरात ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी येतात. त्यामुळे महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात कॉफी सेंटर, रेस्टॉरंटस्‌चा व्यवसाय तेजीत आहे. तेथे प्रेमीयुगुले एका कॉफीसाठी दोनशे रुपये मोजतात. अनेक रोडरोमिओ महाविद्यालये, खासगी क्लासेस, अभ्यासिका या परिसरात आधुनिक दुचाकींवरून वेगाने जात मुलींची छेडछाड करतात. यांना विचारण्याचे धाडसही होत नाही. त्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

शिराळा नाका परिसरात कन्या महाविद्यालय आहे. या परिसरातच सकाळपासून दिवसभर रोडरोमिओंचा वावर असतो. या परिरसरातील गुटखा, मावा विक्री करणारे पानटपरी व्यावसायिक जोमात आहेत. तेथे टोळक्या-टोळक्याने रोडरोमिओ उभे असतात. त्यांच्या छेडछाडीमुळे तेथून जाताना महाविद्यालयीन विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. बहे रस्ता, ताकारी रस्ता, महादेवनगर, सावकार कॉलनीत असलेल्या महाविद्यालय आणि खासगी क्लासेस परिसरातही रोडरोमिओंचा वावर असतो. त्यांच्या ‘बंदोबस्ता’चे आव्हान पोलिसांसमोर आहे.

चौकट

भीतीमुळे वाच्यता नाही

एका महिला पालकाने सांगितले की, रोडरोमिओंच्या त्रासामुळे मुली दोन-दोन दिवस महाविद्यालयांत जात नाहीत. पालकांना सांगावे तर त्याचे रूपांतर भांडणात होते, या भीतीने मुली रोडरोमिओंबद्दल वाच्यता करत नाहीत.

कोट

रोडरोमिओंबद्दल आमच्याकडे काही तोंडी तक्रारी आल्या आहेत. याबाबत दक्षता घेत असून, अशा रोडरोमिओंवर, दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करू.

- नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर

Web Title: Rodrचेguez's 'settlement' challenge in Islampur