शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रात उपसा बंदी करा

By admin | Updated: November 28, 2015 00:16 IST

जि. प. टंचाई बैठकीत निर्णय : योजनांची वीज बिले टंचाई निधीतून भरावीत; २७.७५ कोटींचा टंचाई आराखडा

सांगली : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागामध्ये भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे बुद्रुक आदी सिंचन योजनांचे पाणी मिळत असणाऱ्या ठिकाणी शेतीसाठी पाणी उपसा बंदी करण्याची सदस्यांनी आक्रमक मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रात उपसा बंदी करण्याचा ठराव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जाहीर केले. तसेच सर्व सिंचन योजनांचे वीज बिल शासनाने टंचाई निधीतून भरण्याची मागणी करण्यात आली. याचबरोबर टंचाईग्रस्त भागातील २७ कोटी ७५ लाखांचा संभाव्य टंचाई आराखडा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी अध्यक्षा होर्तीकर बोलत होत्या. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, सभापती पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता प्रसाद बारटक्के आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पाझर तलाव आणि कोयना धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे सिंचन योजनांच्या कार्यक्षात पाणी उपशावर बंदी घालण्याची सदस्यांनी मागणी केली. त्यानुसार होर्तीकर यांनी, ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रात पाण्याचा शेतीसाठी उपसा करण्यास बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव करून जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. सिंचन योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या सिंचन योजनांची शंभर टक्के वीज बिल शासनाने टंचाई निधीतून भरण्याची शासनाकडे मागणी करणार आहे. याशिवाय, संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्याचा २७ कोटी ७६ लाख रूपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विशेष नळ पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी ४८ लाख, नवीन विंधन विहीर घेणे ३३ लाख ५० हजार, विंधन विहीर विशेष दुरूस्ती आठ लाख ३८ हजार, विहीर व कूपनलिका अधिग्रहण करणे एक कोटी ३६ लाख ९२ हजार, टँकरणे पाणी पुरवठा करण्यासाठी १४ कोटी ४८ लाख, असा १६ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, पुणदी, वाकुर्डे बुदु्रक आदी सिंचन योजना चालू ठेवण्यासाठी त्यांचे विद्युत बिल भरण्यासाठी ११ कोटी असा एकूण २७ कोटी ७५ लाख ३७ हजाराचा संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. यास जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)मुलींना मोफत पासजिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील ३६३ गावांतील शिक्षण घेणाऱ्या मुलींना शंभर टक्के एसटी पासची सवलत देण्याची घोषणा जि. प. अध्यक्षा होर्तीकर यांनी केली. यासाठी जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला ५० लाखांचा निधी शिल्लक आहे. या निधीचा वापर करण्यात येणार आहे.टंचाईग्रस्त३६३ गावांतील आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांचे पाच रूपयांचे केसपेपर शुल्क सहा महिन्यांसाठी माफ करावेजलयुक्त शिवार योजनेत सर्वच गावांचा समावेश करावाजत तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट : सावंतजत तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामुळे बहुतांशी बंधाऱ्यांना गळती लागून पाणी वाहून गेले आहे. ठेकेदार दर्जेदार सिमेंट व वाळू वापरत नसल्यामुळे कामे निकृष्ट होत असून या सर्व कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.रोजगार हमीची कामे सुरु करावीतपीक आणेवारी घरात बसून ठरविली जाते : मनीषा पाटीलआटपाडी तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. उंबरगाव, राजेवाडी, पुजारवाडी गावात भीषण पाणी टंचाई असताना या गावांचा शासनाच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश झाला नाही. अधिकाऱ्यांनी घरात बसून केलेल्या अहवालाची किंमत हजारो शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे, असा आरोप जि. प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील यांनी केला. तसेच आटपाडी तालुक्यातील सर्व गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी केली.‘आरोग्य’चे शुल्क रद्दला सदस्यांचा विरोधहोर्तीकर व सभापती कोठावळे यांनी दुष्काळग्रस्त भागातील केसपेपर शुल्क रद्द करण्याची घोषणा केली. यास छायाताई खरमाटे, सूर्यकांत मुटेकर यांनी विरोध केला. मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे यांनीही, असे झाले तर आरोग्य केंद्रांना सादिल निधी देण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी लागेल, असे सांगितले.