वाळवा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:06+5:302021-04-11T04:26:06+5:30

फोटो ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी जयंतीनिमित आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन वैभव नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Response to blood donation camp at Valva | वाळवा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

वाळवा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

फोटो ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी जयंतीनिमित आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन वैभव नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधुकर वायदंडे, व्ही. के. चेंडके, डाॅ. वैशाली बिराजदार, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग अस्वस्थ आहे. रक्ताचा साठा कमी आहे. अशावेळी कुसुमताई तथा माई यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिभूमीत रक्तदान शिबिर घेऊन वैद्यकीय क्षेत्राला मदत केली आहे. रक्तदान केलेल्या युवकांना आज अडचणीत असलेला देश आणि देशातील जनता कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन वैभव नायकवडी यांनी केले.

हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सांगलीतील शिरगावकर ब्लड बँकेच्या डाॅ. वैशाली बिराजदार, दिलीप फाळके, मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, संगीता पाटील, विकास पाटील, महेश साळुंखे, बेबी फादर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिरगावकर रक्तपेढीने रक्तदान संकलन केले. हुतात्मा साखर कारखाना, हुतात्मा बझार, बँक, दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी, विविध हायस्कूल व महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी रक्तदान केले.

Web Title: Response to blood donation camp at Valva