शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; 'या' मार्गावरील वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 18:18 IST

धरणात २९.०१ टीएमसी पाणीसाठा

गंगाराम पाटीलवारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पाऊस होत आहे. अतिवृष्टी होत असल्याने पाणलोट क्षेत्रातुन  हजार  ९८५१  क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आज, सोमवारी दुपारी धरणाचे वक्राकार दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यातून १६७५ क्युसेक विसर्ग व जलविद्युत केंद्राकडून १३७५  असा एकूण ३००० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत आला आहे. त्यामुळे वारणा नदीचेपाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली.मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी  विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावानी सतर्कता बाळगावी असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर तर आज सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात ३५ मिलिमीटर असा एकूण ३२ तासात ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर एकूण १४८७ मिलिमीटर  पाऊस येथे बरसला आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने येथे पूर्णपणे उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे चार ही दरवाजे उघडून १ हजार ३२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून १६७५ कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.आज दुपारी चार वाजता चांदोली धरणाची पाणी पातळी  ६२१.४० मीटर इतकी आहे. धरणात २९.०१ टीएमसी पाणीसाठा असून धरण ८४.३३ टक्के भरले आहे. दरम्यान धरणाच्या दरवाजा केबीन मध्ये औपचारिक पुजा करून धरणातील पाण्याचे पुजन  कार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा अधिकारी  गोरख पाटील यांच्या हस्ते करून धरणाचे वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने खुले करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणीriverनदी