शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार व्यापाऱ्यांचा नोंदणीला ठेंगा

By admin | Updated: September 24, 2015 23:55 IST

एलबीटीचा तिढा : सोमवारपासून महापालिकेची कारवाई मोहीम; बारा जणांवर जप्ती

सांगली : गणेशोत्सवामुळे थंडावलेल्या एलबीटी वसुलीला सोमवारपासून गती देण्यात येणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात बारा व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. अजूनही दीड हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीअंतर्गत नोंदणीच केलेली नाही. या व्यापाऱ्यांवर जप्ती व फौजदारी कारवाईसाठी आयुक्त अथवा उपायुक्तांची आवश्यकता नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन धजावत असल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिका हद्दीत सुमारे वीस हजार व्यापारी आहेत. त्यापैकी बारा हजार व्यापारी एलबीटीसाठी पात्र ठरत आहेत. या बारा हजारांपैकी दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणीच केलेली नाही. प्रशासनाने नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नोंदणी व कर भरणाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली आहे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांचा महापालिका हद्दीतील व्यवसायच बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे त्यांच्यावर थेट फौजदारी दाखल करण्याची कारवाई होऊ शकते. राज्य शासनाने एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईला स्थगिती दिलेली नाही. तरी महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने, त्यात कुठे तरी पाणी मुरत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, गणेशोत्सवामुळे महापालिकेने थकबाकीदार व्यापाऱ्यांवरील कारवाई थांबविली होती. आता सोमवारपासून जप्तीची कारवाई केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात बारा व्यापारी रडारवर असल्याचे एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. एलबीटी रद्द झाल्यापासून महापालिकेला दरमहा पावणेआठ कोटी रुपयांचे अनुदान मिळत आहे; पण गेल्या दोन वर्षांत व्यापाऱ्यांनी कर भरण्यास ठेंगा दाखविल्याने पालिकेची तिजोरी रिकामी झाली होता. आजअखेर १०७ कोटी रुपयांचा एलबीटी व्यापाऱ्यांकडे थकित असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. बारा हजारांपैकी केवळ चार ते पाच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी जमा केला आहे. त्यात अभय योजनेत अनेक व्यापारी सहभागी झाले आहेत. त्यांची विवरणपत्रे तपासणीसाठी कर सल्लागारांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी) दोन्ही उपायुक्तांकडे पदभारएलबीटीबाबतचे अधिकार उपायुक्त सुनील नाईक यांना देण्यात आले होते; पण आता सांगलीचे उपायुक्त सुनील पवार यांनाही कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. नाईक यांच्याकडे नोंदणीकृत व्यापाऱ्यांवर कारवाईचे अधिकार दिले आहेत, तर नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांवरील कारवाईसाठी एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा?एलबीटी कायद्यात व्यापाऱ्यांवर जप्ती, फौजदारी, दुकान तपासणीची कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त अथवा उपायुक्तांना देण्यात आले आहेत. पण ज्या व्यापाऱ्यांनी नोंदणीच केलेली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाची गरज नाही. त्या त्या विभागातील एलबीटी निरीक्षक थेट व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करू शकतो. नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांचा व्यवसायच बेकायदेशीर आहे.