शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:54 IST

बंडखोरी टाळण्यास नेत्यांकडून प्रयत्न

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी १९०० इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६५७ व पंचायत समितीसाठी एक हजारांवर अर्जांचा समावेश आहे. दाखल अर्जांची गुरुवार दि. २२ रोजी छाननी होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले.पाच दिवसांच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला.बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून सावध पवित्रा घेत अधिकृत उमेदवारांना पक्षाचे ‘ए. बी.’ फॉर्म देण्यात आले. वाळवा आणि मिरज तालुक्यांची माहिती रात्री उशीरापर्यंत मिळाली नाही. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गटासाठी ५०० आणि पंचायत समिती गणासाठी ८१९ अर्ज दाखल झाले.

बंडखोरी टाळण्यास नेत्यांकडून प्रयत्नजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

तालुकानिहाय दाखल अर्ज संख्यातालुका / जिल्हा परिषद गट/ पंचायत समिती गणकडेगांव / ३९ / ९५शिराळा / ३४ / ७८खानापूर / ३२ / ४४आटपाडी / ६७ / १२५तासगाव / ७२ / १७७कवठेमहांकाळ / ८० / १२५जत / ११३ / १७५पलुस / ६३ / ९७वाळवा ७८/१६३

English
हिंदी सारांश
Web Title : Record 1900 Applications Filed for Sangli Zilla Parishad Elections

Web Summary : Sangli Zilla Parishad elections see a record 1900 applications. Scrutiny begins Thursday. Political parties attempt to prevent internal rebellion. Leaders focus on negotiations.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५