शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रध्दाच समाजाच्या ऱ्हासाचे कारण

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

शैला दाभोलकर : हणमंतवडिये येथे ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील’ पुरस्कार प्रदान

कडेगाव : देशामध्ये दीडशे वर्षांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याबाबत प्रबोधन होत आहे, परंतु अद्यापही हा दृष्टिकोन समाजामध्ये रुजलेला नाही. अंधश्रध्देमुळेच भारतीय समाजाचा मोठा ऱ्हास झाला आहे. विचार आणि आचार यामध्ये सुसंवाद निर्माण झाला, तरच संस्कारक्षम समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन शैला दाभोलकर यांनी केले.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथील क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) अकादमीच्यावतीने २०१५ चा ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार’ शैलाताई दाभोलकर यांना आज (गुरुवारी) क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दाभोलकर म्हणाल्या की, विवेकी बाणा, निर्भयपणा आणि विज्ञाननिष्ठा अशा समाजहिताच्या मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. समाजात रुजलेल्या अंधश्रध्देमुळे वर्षानुवर्षे समाजहिताचे नुकसान झाले आहे. हे ओळखून अंधश्रध्देच्या निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अविरत लढा दिला. आपण केवळ शिकलो म्हणजे शिक्षित झालो असे नाही, तर सर्व नीतीमूल्यांची जोपासना करणारेच खरे शिक्षित होत. स्त्रियांनी समाजात निर्भयतेने व आत्मविश्वासाने वावरावे. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून निर्णय घ्यावेत.
यावेळी कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, सध्या व्यक्तिद्वेष आणि विचारद्वेषाचे चुकीचे राजकारण चालले आहे. स्वत: धर्मद्वेषाचे आचरण करून समाजापुढे जाऊन धर्मनिरपेक्षतेची भाषणे सांगणारे राजकारणी समाजात तेढ निर्माण करीत आहेत. नरेंद्र मोदी हे एक अवैज्ञानिक, एकांगी व हुकूमशाही नेतृत्व आहे. अशा प्रवृत्तीच्या नेतृत्वामुळे प्रगत लोकशाहीचे अवमूलन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकशाहीला लोककेंद्रित करण्याची भूमिका आता महत्त्वाची आहे. एकछत्री अंमल करू पाहणाऱ्या मोदी यांना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पक्षाची निर्विवाद सत्ता आणून लगाम लावला.
यावेळी कॉम्रेड किरण माने यांचे भाषण झाले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, स्वा.सै. शाहीर शिवाजीराव पवार, अ‍ॅड. अमित शिंदे, चंद्रकांत देशमुखे, सुभाष पवार, इंद्रजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

द्वेषाचे राजकारण
यावेळी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी देशातील राजकीय वातावरणावर कोरडे ओढले. ते म्हणाले की, देशामध्ये धर्मद्वेषाचे राजकारण करणारे सत्तेवर आले आहेत. काही राजकारण्यांकडून समाजात तेढ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील सुदृढ लोकशाहीचे अशा प्रवृत्तीमुळे अवमूलन वेगाने होत आहे. मात्र प्रत्येकाने विवेकाने वागल्यास अशा प्रवृत्तींचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही.