दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:38+5:302021-02-20T05:18:38+5:30

केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी रावसाहेब पाटील यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्याचा प्रस्ताव मांडला. यास उपाध्यक्ष दत्ता डोर्ले व ...

Raosaheb Patil as the President of South India Jain Sabha | दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील

दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील

केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी रावसाहेब पाटील यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्याचा प्रस्ताव मांडला. यास उपाध्यक्ष दत्ता डोर्ले व सल्लागार समितीचे प्रा. डी. ए. पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर फेरनिवड झाली.

भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब जि. पाटील, दत्ता डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा. पा. पाटील यांनी पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी औरंगाबाद विभागाचे श्रीपाल गंगवाल, फुलचंद जैन, पुणे विभागाचे मिलिंद फडे, अंबड विभागाचे रमेश गंगवाल, सरिता काला, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, जैन महिला परिषदेचे अध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, विजया पाटील, कमल मिणचे, सरोजिनी होसकल्ले, प्रा. ए. ए. मुडलागी, एम. डी. दानोळी, राहुल चौगुले, प्रशांत पाटील -मजलेकर, रवींद्र पाटील, सुरेश रोटे, स्तवनिधीचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जयपाल चिंचवाडे, पोपटलाल डोर्ले आदी उपस्थित होते.

चौकट

दक्षिण भारत जैन सभेला ऊर्जितावस्था

रावसाहेब पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दक्षिण भारत जैन सभेला ऊर्जितावस्था आली. संस्कार, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर आधारित कार्यप्रणालीची घोषणा त्यांनी केली. शाश्वत शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सुरुवातीस ५८ लाखांवर असलेला शिष्यवृत्ती फंड आज दोन कोटी ६२ लाखांपर्यंत पोहोचला आहे. सांगली व हुबळी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी, जयसिंगपूर येथे वीर महिला मंडळाचे कार्यालय, पद्माळे येथे संस्कृतिक भवनसाठी एक एकर जमीन खरेदी, सांगली बोर्डिंग, सांगली श्राविकाश्रम वसतिगृह व बेळगाव येथे प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे स्मारक असे सुमारे पाच कोटी रुपयांचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: Raosaheb Patil as the President of South India Jain Sabha