रावसाहेब कोरे यांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:38+5:302021-09-25T04:27:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : माणसाने जीवनात किती लोकोपयोगी कामे केली हे त्याच्या लोकसंग्रहाने दिसते. याची जाणीव रावसाहेब ...

Raosaheb Kore's work is inspiring | रावसाहेब कोरे यांचे कार्य प्रेरणादायी

रावसाहेब कोरे यांचे कार्य प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबे डिग्रज : माणसाने जीवनात किती लोकोपयोगी कामे केली हे त्याच्या लोकसंग्रहाने दिसते. याची जाणीव रावसाहेब कोरे यांच्या कार्यातून होते. त्यांनी जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदत करून स्वत:सोबत नाते निर्माण केले. त्यांचे कार्य प्रेरणादायी होते, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

कवठेपिरान (ता. मिरज) येथे उत्पादन शुल्क निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे पुत्र युवा उद्योजक अरुण कोरे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ राज्यातील पहिल्या सिलिकॉन पुतळा उभारला. या पुतळ्याचे अनावरण खासदार पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, जयश्री पाटील, प्रतीक जयंत पाटील, कोळी महासंघाचे चेतन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

चेतन पाटील म्हणाले, रावसाहेब कोरे यांनी कोळी बांधवांच्या विकासासाठी सातत्याने काम केले. या माध्यमातून सामान्य माणसाला त्यांनी बळ दिले.

दिनकर पाटील म्हणाले, जलसंपदा विभागातील अतिरिक्त ठरलेल्या लोकांच्या नोकरीसाठी कोरे यांनी मोठा संघर्ष करून त्यांना न्याय दिला.

जयश्री पाटील, प्रतीक पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, भीमराव माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला व शिक्षण सभापती आशाताई पाटील, सुनीता रावसाहेब कोरे, मोहनराव कोळी, डॉ. जितेश कदम, विशाल चौगुले, सुरेखा आडमुठे, सरपंच अनिता माने, आकाराम मासाळ आदी उपस्थित होते. हिमंत कोळी यांनी स्वागत केले. अरुण कोरे यांनी आभार मानले.

चाैकट

पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी मान्यवरांच्या हस्ते तानाजी जाधवलिखित ‘लोकसेवक रावसाहेब कोरे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोरे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी कुटुंबीयांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Raosaheb Kore's work is inspiring