शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपद हुलकावणीने खाडेंना धक्का

By admin | Updated: July 9, 2016 00:52 IST

सुरेश खाडे यांची उपेक्षा : भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा पवित्रा

सदानंद औंधे -- मिरज --मंत्रिमंडळ विस्तारात आ. सुरेश खाडे यांची मंत्रीपदावर वर्णी लागली नसल्याने आ. खाडे समर्थक नाराज आहेत. आ. खाडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने ग्रामीण भागातील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात राखीव मतदार संघातून तीनवेळा भाजपतर्फे विधानसभेत निवडून येणाऱ्या आ. सुरेश खाडे यांचा मंत्रीपदावर दावा होता. सलग दुसऱ्यांदा मिरजेतून विजय मिळविल्यानंतर आ. खाडे यांचे मंत्रीपदाच्या शर्यतीत नाव होते. आ. खाडे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र आ. खाडे यांना गेली दोन वर्षे मंत्रिमंडळ विस्तारात प्रतीक्षेतच ठेवण्यात आले. जिल्ह्यातील चार आमदारांपैकी भाजपचा एकही मंत्री नसल्याने आ. खाडे यांची यावेळी तरी मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी समर्थकांची खात्री होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी सख्य असतानाही आ. खाडे यांना यावेळीही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने खाडे समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे. खा. संजय पाटील यांच्याशी आ. खाडे गटाचे सख्य नाही. आ. खाडे यांना मंत्रीपद देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीसुध्दा मौन बाळगले. जिल्ह्यातील व मिरजेतील भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याने आ. खाडे यांचे मंत्रीपद गेल्याचीही चर्चा आहे. आ. खाडे यांनी मंत्रीपदासाठी सरसंघचालकांसह वरिष्ठ नेत्यांकडून भाजप नेतृत्वावर दबाव आणल्यानंतरही एनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने यामागे मोठे कारस्थान असल्याचा कार्यकर्त्यांचा संशय आहे. जिल्ह्यातून शिवाजीराव नाईक व आ. सुरेश खाडे यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस असल्याचे अखेरपर्यंत चित्र होते. मात्र प्रत्यक्षात दोघांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. आ. खाडे यांची मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याने मिरजेत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. खाडे यांना पक्षाने मंत्रीपद देणे आवश्यक होते. आ. खाडे यांची उपेक्षा कशासाठी? हे पक्षकार्यकर्त्यांना उमगलेले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे शहराध्यक्ष तानाजी घार्गे यांनी सांगितले. कारण शोधावे लागेल : खाडेमला मंत्रीपद न देण्याचे कारण समजलेले नाही. मंत्रीपद न मिळण्याचे कारण शोधावे लागेल. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही. वरिष्ठ नेत्यांना पक्ष चालवायचा आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रीपद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेतला आहे. मला मंत्रीपद मिळू नये यासाठी पक्षातील कोणी नेत्यांनीही अडथळा आणलेला नाही किंवा पक्षाचा पदाधिकारी असल्याने मंत्रीपद मिळाले नाही, असेही नाही. मंत्रीपद नसले तरी माझे काम सुरूच राहील. आता पुढील विस्तारावेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले.