शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री चषक कबड्डी: ठाणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीणची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:30 IST

आक्रमक चढाया, हनुमान उडीचा थरार

सांगली : सांगलीवाडीतील चिंचबागेत सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री चषक’ ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आक्रमक चढाई, हनुमान उडी, सुपर टॅकल असा थरार अनुभवास येत असून, प्रेक्षक गॅलरी खचाखच भरत आहे. ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीण आदी संघांनी विजयाकडे आगेकूच केल्याचे तिसऱ्या दिवशी दिसून आले.कुमार गटाच्या सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी जालना संघाने सोलापूरचा, कोल्हापूरने हिंगोलीचा, परभणीने धुळेचा, पुणे शहरने मुंबई शहर पश्चिमचा, पालघरने धाराशिवचा, छत्रपती संभाजीनगरने साताराचा, ठाणे ग्रामीणने मुंबई शहर पूर्वचा, रायगडने बीडचा, नंदूरबारने नांदेडचा, सांगलीने नाशिक शहरचा, पिंपरी-चिंचवडने अहिल्यानगरचा, पुणे ग्रामीणने लातूरचा, मुंबई उपनगर पूर्वने रत्नागिरीचा पराभव केला. जळगाव जिल्हा विरुद्ध नाशिक ग्रामीण सामना बरोबरीत सुटला. ठाणे शहरने सिंधुदुर्गचा पराभव केला.

सोमवारी सायंकाळी लातूरने नाशिक ग्रामीणचा (२९-२६), ठाणे शहरने नंदूरबारचा (३८-२२), पुणे ग्रामीणने जळगावचा (५९-२१), मुंबई उपनगर पश्चिमने मुंबई शहर पश्चिमचा (५२-४६), पिंपरी-चिंचवडने साताराचा (६६-१८), अहिल्यानगरने छत्रपती संभाजीनगरचा (४३-२७) असा पराभव केला.रात्री सांगली विरुद्ध ठाणे ग्रामीण हा तिसऱ्या दिवशीचा अत्यंत चुरसीचा सामना झाला. दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया, पकडी करत सुपर टॅकल करत उत्कंठा वाढवली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात २८-२८ अशी शेवटची चार मिनिटे बाकी असताना बरोबरी होती. शेवटच्या मिनिटाला ३१-३१ अशी बरोबरी होती. ठाणे ग्रामीणला चढाईची संधी होती, तेव्हा चढाई करणाऱ्याने अत्यंत चपळाईचे दर्शन घडवत बोनस गुण वसूल केला. अवघ्या एका गुणाने ठाणे ग्रामीणने विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

कबड्डी शौकीनांची तोबा गर्दीसांगलीवाडीतील चिंचबागेत कबड्डी म्हंटले की खचाखच गर्दी होते. यंदाच्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी प्रेक्षक गॅलरी खचाखच भरत आहे. काही उत्साही मंडळी नवीन पुलावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत, तसेच गॅलरीच्या बाजूला गर्दी करून सामने बघितले जात आहेत.

सर्वच संघांकडून उत्कृष्ट खेळयंदाच्या कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धेत जवळपास सर्वच संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन होत आहे. त्याचबरोबर पकडीही केल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांकडून दाद दिली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीKabaddiकबड्डीPuneपुणेthaneठाणेMumbaiमुंबई