शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांचे ‘१०८’ कनेक्शन

By admin | Updated: October 18, 2015 23:56 IST

रुग्णांना आर्थिक भुर्दंड : अधिवेशनात लक्षवेधी मांडणार : शिवाजीराव नाईक

विकास शहा- शिराळा‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत रुग्णांना तातडीने सेवा मिळत आहे. मात्र या रुग्णवाहिकेमार्फत रुग्णांना शासकीय रुग्णालयाऐवजी ‘खासगी’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने, या सेवेबाबत शंका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी आ. शिवाजीराव नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या असून, याबाबत आपण येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बी.व्ही.टी. या कंपनीद्वारे १०८ क्रमांक डायल केल्यावर काही वेळातच रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेसाठी हजर होते. ही सेवा चालू झाल्यापासून अनेक रुग्णांवर वेळेत उपचार झाले. काहींचे प्राणही वाचले. त्यामुळे ही चांगली सेवा असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ही सेवा मोफत असल्याने गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.अपघात, जळीत, सर्पदंश अशा घटना घडल्यावर तातडीने ही रुग्णवाहिका उपलब्ध होते. रुग्णांना घेऊन शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणले जाते. त्यामुळे वेळेत अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार होतात. मात्र ज्या रुग्णांची परिस्थिती गंभीर असेल अथवा त्यांच्यावर या ठिकाणी उपचाराची सोय नसेल, त्यांना पुढील उपचारासाठी सांगली, कोल्हापूर अथवा कऱ्हाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सोबत तसे पत्र देऊन पाठविले जाते. मात्र या रुग्णांना या शासकीय रुग्णालयात न नेता काही ठराविक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते. गेल्या काही दिवसात खासगी रुग्णालयात रुग्णांना नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही नातेवाईकांनी याबाबत आमदार नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. गोरगरीब जनतेला मोफत सेवा शासकीय रुग्णालयात मिळत असताना, त्यांना महागड्या रुग्णालयात नेले जाते. त्यामुळे रुग्णालयाची बिले भरताना नातेवाईकांची मोठी दमछाक होते.नागपंचमीदिवशी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेले ६ रुग्ण होते. त्यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यातील ४ रुग्णांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याहीपेक्षा या खासगी रुग्णालयांनी शिराळा ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लसी नेऊन या रुग्णांवर उपचार केले. यादिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. हंकारे यांनी संबंधित रुग्णवाहिकेतील डॉक्टर महिलेची कानउघाडणी केली. सांगली शासकीय रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्ष उघडला असताना, रुग्णांना खासगी रुग्णालयात का नेले? रुग्णांवर मोफत उपचार होत होते, त्यांना आर्थिक भुर्दंड का बसविला? अशा शब्दात त्यांनी कानउघाडणी केली होती. १०८ या आपत्कालीन रुग्णसेवेमार्फत आतापर्यंत खासगी रुग्णालयात किती व शासकीय रुग्णालयात किती रुग्ण पाठविण्यात आले, तसेच कोणकोणत्या खासगी रुग्णालयात हे रुग्ण नेण्यात आले, याची संपूर्ण माहिती घेऊन याबाबत आपण अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहे.- शिवाजीराव नाईकआमदारदोनच दिवसांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास जास्तीत जास्त रुग्णांना मोफत व वेळेत सेवा मिळावी, यासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल करावेत. जर रुग्णांच्या नातेवाईकांनी परवानगी दिली, तरच त्यांनी सांगितलेल्या रुग्णालयात रुग्ण पाठविण्यात यावा, असा आदेश आला आहे.- डॉ. वेदांत मोरे, रुग्णसेवा अधिकारीरूग्णांची अगतिकता : आर्थिक पिळवणूकरूग्णाच्या नातेवाईकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णवाहिकेतून नेण्यात आलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, पेठ नाक्यापर्यंत सतत रक्तदाब तपासून, ‘तुमचा रुग्ण अतिगंभीर आहे. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊया’, असे सांगण्यात येते. त्यामुळे नातेवाईक घाबरतात व लवकर उपचार व्हावेत, यासाठी खासगी रुग्णालयात जायला तयार होतात. तेथे उपचारादरम्यान विविध तपासण्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. रूग्णाचे हाल होतात, ते वेगळेच.