शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:09 IST2025-04-09T15:07:30+5:302025-04-09T15:09:43+5:30

सांगली : जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण धडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी लिहिले आहेत. ७०० गावांचे २२६३ धडे लिहिले ...

Primary school teachers wrote 2263 lessons covering 700 villages, providing information about all the villages in Sangli district | शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे

शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे

सांगली : जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण धडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी लिहिले आहेत. ७०० गावांचे २२६३ धडे लिहिले असून त्याचे एकत्रित प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शिक्षकांनी तयार केलेल्या संगणक अभ्यासक्रमाचे व व मॉडेल स्कूल प्रारूपाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या संकल्पनेतून माझ्या गावच्या धड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सर्व शिक्षक लिहिते झाले आहे. २२६३ धड्यांतील निवडक तालुकानिहाय धड्यांची संख्या अशी : शिराळा १४७, वाळवा ८५, खानापूर ८६, मिरज १२७, जत मराठी २५६ व कन्नड ११२, कडेगाव ९६, पलूस ६५, आटपाडी ८७, कवठेमंकाळ ८०, तासगाव १०२. प्रत्येक तालुक्यातून८० व केंद्रस्तरावरील २० अशा १०० पुस्तिका तयार केल्या आहेत. जत तालुक्यात कन्नड माध्यमातील २ व तासगाव नगरपरिषदने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे.

माझ्या गावचा धडा या उपक्रमासाठी विस्ताराधिकारी डॉ. विमल माने, स्वाती शिंदे, बाबा परीट, गौतम कांबळे, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, संदीप पाटील, दीपक रोकडे, वैशाली आडमुठे, सुषमा डांगे, अर्जुन जाधव, व साळुंखे, अवधूत भोसले, दीपक माळी, नितांत तांबडे, नीलेश कांबळे, तारीश आत्तार, महादेव देसाई, रमेश तिके, कपिल कांबळे व राजू केंगार यांनी परिश्रम घेतले. सहायक प्रशासन अधिकारी स्वप्नाली माने व सहकाऱ्यांनी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले.

तालुकास्तरावर आबासाहेब लावंड, प्रमोद गोफणे, राम फरकांडे, तेजस्विनी पवार, विकास राजे, पोपट मलगुंडे, अजिंक्य कुंभार, सिद्धराय्या चिखलगी, ज्ञानेश्वर चिमटे, जगन्नाथ कोळपे यांनी उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम केले.

गावांचा इतिहास, भूगोल शब्दांकित

माझ्या गावचा धडा उपक्रमाच्या निमित्ताने या गावांचा इतिहास व भूगोल शब्दांकित झाला. अनेक गावांविषयी प्रथमच लिहिले गेले. गावातील इतिहासकालीन वास्तू, स्मारके, विकासाच्या वाटेवरील प्रवास, गावाला अभिमानास्पद असणारे थोर पुरुष यांच्याविषयी पुस्तकात लिहिले आहे.

Web Title: Primary school teachers wrote 2263 lessons covering 700 villages, providing information about all the villages in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.