शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी दबाव

By admin | Published: December 20, 2015 11:04 PM

राजीनाम्याची शक्यता : तासगावात काका गटाच्या नगरसेवकांची मोर्चेबांधणी

दत्ता पाटील -- तासगावनगरपालिकेतील भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष नकोत, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी काका गटाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांच्या राजीनाम्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा संघर्ष आहे. मात्र पालिकेच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष अद्यापही एकत्र आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून तासगावात भाजपचा राष्ट्रवादीशी घरोबा कायम या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत कुजबूज सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांपर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या. पालिकेत राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आबा गटाचे अधिकृत संख्याबळ चार आहे. त्यातही पुन्हा दोन गट आहेत. त्यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असतानादेखील राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्षपद असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष भाजपचाच हवा, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाचे असले तरी सद्यस्थितीत त्यांचे पद भाजपच्या पुण्याईवरच कायम राहिल्याचे चित्र आहे. पालिकेत सद्यस्थितीत भाजपचे संख्याबळ भक्कम आहे, तर थोरात यांच्या पाठीशी केवळ दोन नगरसेवकच उभे राहतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपकडून राजीनाम्याची मागणी झाल्यामुळे थोरात उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपच्या काही नगरसेवकांकडूनही तशी शक्यता व्यक्त होत आहे.उपनगराध्यक्षपद भाजपकडे असावे, अशी आमच्या पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दोन दिवसांत नगरसेवकांची पक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या भावना विचारात घेऊन, नगरसेवकांची निर्णय खासदार संजयकाका पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यानंतर खासदार संजयकाकांच्या आदेशानुसारच उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. - अनिल कुत्ते, पक्षप्रतोद, तासगाव नगरपालिका.उपनगराध्यक्षपदाच्या बदल्यात सभापतीपद तासगाव पालिकेत भाजपचे कमळ फुलविण्यात राष्ट्रवादीच्या सुरेश थोरात, सुशिला साळुंखे आणि अनुराधा पाटील या तीन नगसेवकांची महत्त्वाची कामगिरी बजावली होती. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांचा आदेश झुगारुन तीनही नगरसेवकांनी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक संजय पवार यांच्या उचलबांगडीसाठी पुढाकार घेतला होता. आता भाजपमध्ये उपनगराध्यक्षपद ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपद काढून घेतले तरी मदतीच्या मोबदल्यात एखादे पद त्यांच्याकडे असावे, यासाठी अनुराधा पाटील यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद दिल्याची चर्चा आहे.