शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गर्भपातावेळी विवाहितेचा चिक्कोडीत मृत्यू, पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:13 IST

मृत्यूच्या दाखल्यासाठी मृतदेहासह सांगलीत भटकंती 

सांगली : जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या गर्भवतीचा कर्नाटकातील चिक्कोडी येथे गर्भपातावेळी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईक मृतदेह मोटारीमध्ये घालून सांगलीत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. सोनाली सचिन कदम (वय ३२ रा. आळते, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर ) असे मृत महिलेचे नावे आहे. सोनालीचे दुधगाव (ता. मिरज) हे माहेर आहे.दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षांपूर्वी आळते येथील तरुणाशी विवाह झाला आहे. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. तिला दोन मुली असून, तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले. त्यांनी चौकशी करून काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी केली. तेथील अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिक्कोडी गाठले. चिक्कोडीजवळील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. परंतु, गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंताजनक बनली व तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला.

सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये म्हणून तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. परंतु, मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा? यासाठी तिचा मृतदेह मोटारीत घालून नातेवाईक सांगलीत आले. सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते सायंकाळी चौकशी करत फिरत होते. सायंकाळी बसस्थानक परिसरात मोटारीत मृतदेह ठेवून नातेवाईक फिरत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली.पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशयितांना ताब्यात घेण्यास सांगितले. गुन्हे प्रकटीकरणचे गौतम कांबळे, सुमित सूर्यवंशी आणि इतर कर्मचारी यांनी बसस्थानक परिसरात थांबलेल्या मोटारीजवळ जाऊन पाहणी केली. तेव्हा मोटारीत मृतदेह ठेवल्याचे दिसले. चौकशीवेळी मृतदेहासोबत असलेल्या नातेवाईकांनी सर्व हकीकत सांगताच पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने मोटार सिव्हील हॉस्पिटलकडे नेली.रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या प्रकरणाची चौकशी, तपासणी सुरू होती. चिक्कोडी पोलिसांनाही हा प्रकार कळविण्यात आला. चिक्कोडी पोलिस ठाणे हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे तेथे गुन्हा वर्ग होणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.गर्भलिंग चाचणीचे जयसिंगपूर कनेक्शनकोल्हापूर जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा तपास करताना सांगलीवाडी कनेक्शन समोर आले होते. सांगलीवाडीतून गर्भपाताची औषधे पुरविणाऱ्याला नुकतीच अटक केली. त्यानंतर दुधगाव येथील गर्भवतीची जयसिंगपूरमध्ये चाचणी करून चिक्कोडी येथे गर्भपातासाठी नेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर आणखी एक प्रकरण पुढे आले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरAbortionगर्भपातWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस