शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

परिसंवादातील सूर : मूलनिवासी संघाच्यावतीने ‘सांस्कृतिक दहशतवाद व लोकशाही’ विषयावर मंथन

सांगली : सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने पुरोगामी कार्यकर्त्यांनी स्वत:ला समाजापासून वेगळे न मानता त्यांच्याशी एकरूप होऊन आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असल्याचे मत मूलनिवासी संघाच्यावतीने आयोजित परिसंवादात आज, रविवारी विविध वक्त्यांनी व्यक्त केले. रोटरी सभागृहात ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने आणि जबाबदारी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ‘अंनिस’चे अ. रा. आर्डे म्हणाले की, दहशतवाद हा एक विचार आहे. याच्या हल्ल्यात सर्वच जाती-धर्माचे लोक बळी पडले आहेत. त्यामुळे विशिष्ट जातींवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नये. दहशतवाद हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो. युध्दामध्ये जेवढी माणसे मृत्युमुखी पडली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे धार्मिक दहशतवादाची बळी ठरली आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावे. याचा मुकाबला एकजुटीने केला पाहिजे. पुरोगामी संघटनेतील सर्वांनीच विचारांनी एकरुप होऊन कार्य केले पाहिजे. विद्रोही संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव म्हणाले, आपण सर्वांनीच विवेकाचा आग्रह धरला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या जातीबद्दल तिरस्कार करुन उपयोग नाही. त्यामुळेच आपण समाजापासून अलग पडतो आहोत. आपले शत्रू कोण आहेत याची विभागणी प्रत्येकाला विचारांच्या आधारावर करता आली पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सध्या पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेचे वातावरण आहे. हुकूमशाहीचा डंका वाजला पाहिजे म्हणून काही शक्ती प्रयत्नशील असल्या तरीही, कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्थेचा अभ्यास करुन त्यानुसारच चळवळीला दिशा दिली पाहिजे. अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांची विखुरलेली ताकद एकत्र आणून चळवळ आधुनिक करण्याची गरज आहे. तसेच सध्या आपण कोठे आहोत याचाही विचार करावा. शाहीन शेख यांनी, चळवळीतील प्रत्येकाने आशावादी दृष्टिकोन ठेवावा व वाचनाचा व्यासंग वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी हुमायूम मुरसल, रुपेश तामगावकर, नगरसेवक संतोष पाटील आदींनीही या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)