शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकातच

By admin | Updated: December 15, 2015 00:44 IST

शेखर गायकवाड : रेणावी येथे १४ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

विटा : जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकात असते. पुस्तके माणसांचे आयुष्य बदलून टाकतात. गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांच्यासारखे महान साहित्यिक माणदेशाने महाराष्ट्राला दिले. परंतु, महाराष्ट्राला त्यांची कदर नाही, अशी खंत व्यक्त करून, व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ला नोबेल पारितोषिक देण्याची खरी गरज असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.रेणावी (ता. खानापूर) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या सहयोगाने श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, कला विकास मंचच्यावतीने रविवारी १४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या संमेलनावेळी बाल साहित्य मंचचे उद्घाटन ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, सरपंच सौ. रेखा भिंगारदेवे उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, लहान मुले फार संवेदनाक्षम असतात. शाळेतील मुलांच्या कथा, कविता व लेख यांचे मोठे पोस्टर तयार करून शाळेतील भिंतीवर लावले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर मुले लिहिती होतील. सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांची बैठक लवकरच घेण्यात येणार असून सर्व साहित्यिकांची पुस्तके व त्यांची छायाचित्रे जिल्ह्यातील वेबसाईटमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. यावेळी ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांनी, मुले लहान असताना त्यांना कथा, कविता लिहिण्याची आवड असते. त्यामुळे पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीमती शहाबाई यादव विकास मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी स्वागत केले. रेणावी येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे नवोदित साहित्यिकांना मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या संमेलनात राजा मंगसुळीकर, अनिल पाटील, सतीश लोखंडे, सु. धों. मोहिते, विश्वनाथ गायकवाड, एम. बी. जमादार, रघुराज मेटकरी, राहुल वीर यांनी कविता सादर केल्या. या संमेलनास बाळासाहेब लकडे, देवदत्त राजोपाध्ये, विलास पाटील, प्रा. संजय ठिगळे, किमया पाटील, सीमा सावंत, पद्माकर यादव, जितेंद्र यादव उपस्थित होते. (वार्ताहर)रसिकांची दादसाहित्यिक अस्मिता इनामदार, दयासागर बन्ने, जगन्नाथ विभुते यांना ‘श्रीमती शहाबाई यादव गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संमेलनावेळी व्यासपीठावर पन्नासहून अधिक बालसाहित्यिकांनी आपल्या कथा, कविता, कथाकथन सादर केले. त्यास रसिकांनी दाद दिली.