Sangli Crime: जतमधील दोन्ही खुनांचा छडा; लग्नाच्या तगाद्यातून महिलेला संपविले, तर जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:13 IST2026-04-01T12:13:31+5:302026-04-01T12:13:49+5:30

मृताच्या मोबाइलच्या सीडीआरवरून २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले

Police investigation reveals that a woman was murdered in Jat due to pressure for marriage, while a young man from Bilur was murdered over a land dispute | Sangli Crime: जतमधील दोन्ही खुनांचा छडा; लग्नाच्या तगाद्यातून महिलेला संपविले, तर जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा खून

Sangli Crime: जतमधील दोन्ही खुनांचा छडा; लग्नाच्या तगाद्यातून महिलेला संपविले, तर जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा खून

जत : जत तालुक्यात सोमवारी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. यांतील अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी उमदी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धाप्पा मदाप्पा आमागोडरू (वय ३७, रा. हळदोडवरू गल्ली, उमदी) असे संशयिताचे नाव आहे; तर मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव सविता विजय घोडके (३२, रा. वांगी, ता. कडेगाव) असे आहे. लग्नाचा तगादा लावल्याने त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. बिळूर येथील खून हा जमिनीच्या वादातूनच झाला असून या प्रकरणी दोन सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी जतजवळ अनोळखी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. मृताच्या मोबाइलच्या सीडीआरवरून २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मृत सविता हिचे मूळ गाव जत तालुक्यातील उटगी आहे. तिचे लग्न १० वर्षांपूर्वी वांगी येथील विजय घोडके यांच्याशी झाले.

काही वर्षांपूर्वी तिची उमदीच्या सिद्धाप्पा आमागोडरू याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर तिने सिद्धाप्पाकडे लग्नाचा तगादा लावला होता; पण त्याचेही लग्न झाले असल्याने तो नकार देत होता. त्यामुळे सविताने सिद्धाप्पाच्या घरासमोर मुलाबाळासह पेटवून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

सविता २८ मार्चला सासरहून जतला आली. येथे सिद्धाप्पाची भेट झाल्यावर पुन्हा तिने लग्नाचा तगादा लावला. यामुळे चिडून सिद्धाप्पा तिला दुचाकीवरून अमृतवाडी येथील एका शेतात घेऊन गेला. तिथे पुन्हा वाद झाल्यानंतर सिद्धाप्पाने तिचा ओढणीने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी सिद्धाप्पाला ताब्यात घेतले आहेत.

बिळूरचा खून जमिनीच्या वादातूनच

बिळूर येथील श्रीधर निंगोडा यडगोंड याचा जमिनीच्या वाद आणि सामायिक विहिरीच्या पाणीवाटपातूनच खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर निंगोडा यडगोंड आणि गंगाधर निगोंडा यडगोंड अशी संशयिताची नावे आहेत. यातील प्रभाकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृताच्या आजोबांच्या नावे असलेल्या सात एकर जमिनीची वाटणी झाली होती. त्यातील एक हिस्सा संशयित प्रभाकर याने चुलत भावंडांना विकला होता. यातून मृत श्रीधर व प्रभाकर यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने प्रभाकर व निंगोडा या दोघांनी श्रीधर याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Web Title : सांगली: दोहरे हत्याकांड का खुलासा; प्रेम त्रिकोण, भूमि विवाद कारण।

Web Summary : सांगली के जत में दो हत्याओं का खुलासा। एक महिला की हत्या विवाह के दबाव के कारण हुई। एक व्यक्ति की हत्या भूमि विवाद के कारण हुई। पुलिस ने दोनों मामलों में संदिग्धों को गिरफ्तार किया है।

Web Title : Sangli: Two murders solved; love triangle, land dispute the motives.

Web Summary : Two murders in Jat, Sangli solved. A woman was killed for demanding marriage. A man was murdered due to a land dispute with his cousins. Police have arrested suspects in both cases.