मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:49 IST2026-03-27T17:49:05+5:302026-03-27T17:49:33+5:30

मिरज : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्याविरोधात शहर ...

Police action against NCP corporator Azam Qazi from Miraj sangli | मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

मिरज : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काझी यांना ताब्यात घेऊन कर्नाटकातील कुडची येथे पाठविले.

मिरज प्रभाग सहामधून राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले आझम काझी यांच्यासह आठजणांना पोलिस अधीक्षकांनी एक वर्षासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. या कारवाईविरोधात काझी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या कारवाईस एक महिन्याची स्थगिती दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काझी मिरजेतच वावरत असल्याचे आढळून आले. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रवीण वाघमोडे यांनी मंगळवारी रात्री स्टेशन रोड परिसरात काझी यांना पकडले. काझी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून जिल्ह्याबाहेर पाठविण्याची कारवाई करण्यात आली.

सुमारे वर्षभरापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून 'अफगाण हॉटेल'वर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले आणि मोहसीन गोदड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली. 

Web Title : मिराज: राष्ट्रवादी नगरसेवक आज़म काज़ी पर पुलिस कार्रवाई, राजनीतिक हलचल।

Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के आज़म काज़ी, जिन्हें सांगली और कोल्हापुर से निष्कासित किया गया था, आदेश का उल्लंघन करने पर मामला दर्ज किया गया। पुलिस ने उन्हें हिरासत में लेकर कुडची, कर्नाटक भेज दिया। होटल हमले के मामले के बाद उन्हें पहले निष्कासित कर दिया गया था।

Web Title : Miraj NCP corporator Azam Qazi faces police action, political stir.

Web Summary : NCP's Azam Qazi, banished from Sangli and Kolhapur, was booked for violating the order. Police detained him and sent him to Kudchi, Karnataka. He was earlier externed following a hotel attack case.