शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू तेच, कर्णधार नवा

By admin | Updated: August 11, 2015 23:38 IST

नवे मुख्याधिकारी : इस्लामपूरची बारामती होणार का?

अशोक पाटील - इस्लामपूर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी इस्लामपूरची बारामती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद सांभाळलेल्या दीपक झिंजाड यांना येथील मुख्याधिकारीपदी बसविले आहे. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेले पालिकेतील खेळाडू तेच आहेत, केवळ कर्णधार नवीन येत आहे. ते तरी इस्लामपूरची बारामती करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पालिकेने विविध विकास कामांवर कोट्यवधीचा खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे केल्याचा दावा केला आहे, परंतु ती निकृष्ट झाल्याने काही प्रकल्पांचे नूतनीकरण करण्याचा डाव आखला आहे. गेल्या साडेचार वर्षात तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी हायटेक सिटी करण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांना दाखविले होते. त्यामध्ये पालिकेतील काही नेते अडकले. मात्र देशमुख यांनी इस्लामपूर शहर केवळ कागदोपत्री हायटेक करून ठेवले. सवंग लोकप्रियतेसाठी सोशल मीडियावर घोषणांचा डंका वाजवला गेला. त्यामुळे आता जयंत पाटील यांनी झिंजाड यांना मुख्याधिकारीपदी काम करण्यासाठी पाचरण केले आहे. मुख्याधिकारी देशमुख यांची बदली करून त्यांच्या जागी झिंजाड यांना इस्लामपुरात आणले असल्याचा दावा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. सध्या इस्लामपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोहण्याच्या तलावाचे तीनतेरा वाजले आहेत. हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली सध्या बंद आहे. अंबिका देवालयानजीकची पूर्वीची बाग उद्ध्वस्त करून त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाग उभारण्याचे काम सुरू आहे. कोट तलाव येथील बोटिंग क्लबचे काम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. घनकचरा नियोजन, प्रभागातील गटारींची अवस्था दयनीय आहे. तुंबलेली गटारे काढण्यास स्वच्छता विभाग असमर्थ ठरला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने पाऊस पडण्याअगोदरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. १९८० पासून नवीन विकास आराखड्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे या नव्या कर्णधाराला जयंतरावांच्या जुन्याच खेळाडूंसमवेत काम करताना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद भूषविलेले दीपक झिंजाड मंगळवारी इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी रूजू झाले आहेत.मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे स्वागतच होईल. त्यांनी पारदर्शक कारभार करणे गरजेचे आहे. सध्या पालिका वर्तुळात एजंट, बोगस ठेकेदारांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व कारभार अनागोंदीसह भ्रष्टाचारी बनला आहे. शहरात होणारा विकास खुंटला असून, जो विकास झाला आहे, त्याचा दर्जा ढासळलेला आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते