शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मुळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा ...

सांगली : कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मुळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र व राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरचे पोट असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली, किती लोक बेरोजगार झाले. त्याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे.

देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनचीच गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्यावं आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा.

दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही, व्यायाम करायचा नाही हा महामूर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का. जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असे भिडे म्हणाले.

चौकट

गांधी आदर्श ठेवून कोरोना वाढेल

शिवछत्रपती व संभाजी महाराजांना आदर्श ठेवून सरकारने कारभार करावा. नोटेवरचे गांधी आदर्श ठेवून हा कोरोना आणखी वाढेल, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.