शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये पाणी बंद

By admin | Updated: September 17, 2015 23:10 IST

दोन तालुक्यातील ३९ गावांचा प्रश्न गंभीर : १४ कोटींचे वीज बिल थकित

कवठेमहांकाळ : ऐन गणेशोत्सवाच्या सणातच ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळातच पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांनी या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या तीन दिवसांपासून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पिण्याचे पाणी बंद झाल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. कवठेमहांकाळ, मणेराजुरी आणि विसापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने तोडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याच्या पाण्यापासून गेले तीन दिवस वंचित राहावे लागले आहे. त्यातच गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने ऐन सणाच्या सुरुवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीचे कारभारी व तालुका प्रशासन झोपा काढीत आहे काय?, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.औदुंबरमधून कृष्णा नदीतून कवठेमहांकाळ, मणेराजुरी, विसापूर या प्रादेशिक पाणी योजनांतून दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. या तीनही योजनांकडे वीज महावितरण कंपनीचे सुमारे चौदा कोटी रुपये वीज बिल येणे बाकी आहे. गेल्या चार महिन्यात प्रशासनाने या थकित बिलाचा एकही रुपाया भरला नसल्याने, वीज महावितरणने धडक मोहीम राबवित या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे दि. १५ सप्टेंबरपासून तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.प्रत्येक महिन्याला या तीनही योजनांचे पंचवीस लाख रुपये वीज बिल येते. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी गोळा करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे हे पैसे जमा करावे लागतात व तेथून ही वीज बिलाची रक्कम भरली जाते. परंतु आॅगस्ट महिन्यापासून पैसेच न दिल्याने अखेर, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी मिळणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (वार्ताहर)पाण्याचा प्रश्न ऐरणीवर  --कवठेमहांकाळ, मणेराजुरी व विसापूर प्रादेशिक पाणी योजनेचे थकित १४ कोटी वीज बिल न भरल्याने महावितरणने या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.