शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे खासगीकरण रोखण्याच्या चळवळीत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST

शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवशेनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी माळकर, उपाध्यक्ष ...

शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवशेनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी माळकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सदानंद भागवत, संस्थाचालक संघाचे जिल्हा सचिव नितीन खाडीलकर, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. एम. एस. रजपूत, आर. एस. चोपडे, प्रशांत चव्हाण, प्रा. एस. ए. आरबोळे आदी उपस्थित होते.

रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षण संस्था सुरू झाल्या. अनेक संस्था चालकांनी पदरमाेड करून शाळा चालविल्या आहेत. या शाळा बंद पाडून भांडवलदारांच्या शाळा चालविण्याचे सध्या सरकारची धोरण दिसत आहेत. अनुदानित शाळा भविष्यात बंद पडल्यास बहुजन समाज शिक्षण प्रवाहातून बाजूला पडण्याचा मोठा धोक्का आहे. म्हणूनच सर्वांनीच भांडवलदारांच्या तावडीतून शिक्षण वाचविण्याच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावरील खर्च वाढविण्याऐवजी दिवसेंदिवस कमी करित आहे हेही चिंताजनक आहे. याबाबतही शिक्षण संस्थाचालकांनी आवाज उठविला पाहिजे.

प्रा. एन. डी. बिरनाळे, सदानंद भागवत, अशोक थोरात, सुरेश पाटील यांनीही शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात सरकारवर जोरदार टीका केली.

चौकट

शिक्षण संस्थांच्या प्रमुख मागण्या

-वेतनेतर अनुदान चार टक्के आणि इमारत भाडे नाममात्र एक टक्का मिळते. यामध्ये शासनाने वाढ करावी.

-शिक्षक, शिक्षकेतर भरतीबंदीमुळे संस्थांना शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे भरतीवरील बंदी उठवावी.

-शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे.

-शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्तीचे जाचक अटी बंद करुन पूर्वीप्रमाणेच भरतीप्रक्रीया सुरु ठेवावी.

चौकट

अधिवेशनास अर्धा डझन मंत्री

अधिवशेनाचे उदघाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, उच्चशिक्षणमंत्री डॉ. उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री बच्चू कडू आदी आर्ध्याडझनाहून जास्त मंत्री अधिवशेनास उपस्थित राहाणार आहेत.