शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील पेपर विक्रेते निघाले बँकॉक दौऱ्यावर..!

By admin | Updated: June 13, 2015 00:12 IST

राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद : ‘कलाक्षेत्रम्’च्या युवा कलाकारांची आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात उपजीविकेसाठी वृत्तपत्र विक्री करणाऱ्या तिघा युवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी आगेकूच केली आहे. आधुनिक नृत्यशैलीचा आविष्कार दाखवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्या युवकांच्या या जिद्दीला शहरवासीयांनी सलाम केला आहे.अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीच्या कलाकारांनी ‘गणेशस्तुती’ या नृत्याचे सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. आबीद मुजावर, नितीश पवार, एलिंगा पुजारी या इस्लामपूरच्या वृत्तपत्र विक्रेत्यांसह अमित बनसोडे, आकाश बनसोडे, अक्षय बनसोडे, अण्णा वाघमारे, रोहित कांबळे, महेश कांबळे (सर्व पलूस), क्षीतिज भिसे (कार्वे), आशिष पवार (विटा) हे सहकलाकार आंतरराष्ट्रीय शिखर पादाक्रांत करण्यासाठी बँकॉकला जाण्याच्या तयारीत आहेत.पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत देशभरातील २0 राज्यांतील सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मोठ्या सहभागाच्या स्पर्धेतून इस्लामपूरच्या कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीने नृत्यशैलीच्या अदाकारीवर प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्यांना प्रसिध्द संगीतकार सुरेश तळवळकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व चषक देऊन गौरविण्यात आले. नृत्य शिक्षक वसंत हंकारे, शशिकांत राडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी हे यश मिळवले.इस्लामपूरसारख्या निमशहरी भागातील कलाकारांना नृत्याचे धडे देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची संधी मिळते, हे नृत्य शिक्षक हंकारे व राडे यांच्या मार्गदर्शनाने सिध्द झाले आहे. त्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. (वार्ताहर)आर्थिक मदतीचे आवाहनशहरातील कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीत नृत्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिद्दीच्या जोरावर परदेशवारी करण्याची संधी मिळाली आहे. हे यश मिळविणाऱ्या सर्वच कलाकारांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शिक्षण घेताना पडेल ते काम करून उपजीविका चालवणाऱ्या या कलाकारांना बँकॉक येथील स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. इस्लामपूरचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या या युवा कलाकारांना शहरातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.