शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने पान उत्पादक हताश

By admin | Updated: July 16, 2015 23:15 IST

उत्पादनात घट : पंधरा दिवसांनी येणारा खुड्याचा फेर तीस दिवसांवर गेला; बाजारात दरही घसरले

दिलीप कुंभार-नरवाड -सध्या पावसाने ओढ दिल्याने लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.उन्हामुळे होरपळून निघालेल्या पान उत्पादकांना पावसाळ्यात रिमझीम पाऊस आणि ढगाळ हवामानाची अपेक्षा होती, मात्र पानवेलींच्या वाढीसाठी पोषक हवामान नसल्याने पानांच्या फुटव्यावर परिणाम झाला आहे. १५ दिवसांनी येणारा खुड्याचा फेर ३० दिवसांवर गेला आहे. याशिवाय पान बाजार पेठेत देखील खाऊच्या पानांना कवडीमोलाची किंमत मिळत असल्याने, पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.पान व्यापाऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम दिसून येत नसून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सारखाच असल्याने, नेहमीच लक्ष्मीच्या पावली कमिशन चालून येत असते. पान उत्पादकांना पानमळ्याचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ होत असून, खुडेकरी आणि वेल बांधणारे यांची मजुरी भागविताना दमछाक होत आहे. ३ वर्षापासून प्रथमच पान उत्पादकांवर मंदीचे सावट कायम असून नेहमी ७०० ते ९०० रूपयांना विकली जाणारी १० कवळ्यांची एक करंडी अवघ्या २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय फापडा पानांच्या एका करंडीला किमान मिळणारा ३००० रुपये दर १००० रुपयांवर येऊन पोहोचला असल्याने पान उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.पान बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कामगारांचा खर्च भागवून हाती काहीच पडत नाही. पानमळ्यात दर नाही म्हणून पाने ठेवल्यास, ती कालांतराने खराब होतात. खाऊची पाने नाशवंत असल्याने बाजारभावाचा विचार न करता पाने खुडावीच लागतात, अशीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास पानमळ्यांचे क्षेत्र वेगाने कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरीमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, चांदवड, रत्नागिरी, सांगोला, उस्मानाबाद आदी पान बाजारपेठा सध्या मंदीच्या खाईत लोटल्या आहेत. मद्रासी पानांची पान बाजारपेठेतील आवक कमी होऊनही, देशी पानांना फारशी मागणी नसल्याने पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे.