पलूस सहकारी बँकेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:45+5:302021-09-03T04:26:45+5:30

बँकेची ५६वी सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेचे एकूण १४२८ सभासदांनी सहभाग नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे ...

Palus Co-operative Bank pays 14% dividend to its members | पलूस सहकारी बँकेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश

पलूस सहकारी बँकेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश

बँकेची ५६वी सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेचे एकूण १४२८ सभासदांनी सहभाग नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

वैभवराव पुदाले म्हणाले की, बँकेचा एकूण व्यवसाय ६८७ कोटींपेक्षा अधिक असून, ठेवी ४०३ कोटींपेक्षा जास्त आहेत. कर्जे २८४ कोटीपेक्षा जास्त आहेत. रिझर्व्ह बँकेचा निर्बंधामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे शिल्लक नफ्यातून कोणत्याही नागरी सहकारी बँकेस लाभांश देता आला नाही. यावर्षीच्या नफ्यातून १४ टक्के लाभांश वाटप खात्यावर जमा केले आहे. बँकेच्या प्रगतीस बँकेचे संचालक व सेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.

विषयाचे तपशीलवार विवेचन उपव्यवस्थापक नारायण सगरे, प्रकाश डाके यांनी केले. यावेळी बँकेचे संचालक विष्णू सिसाळ, प्रकाश पाटील, मार्तंड सदामते, रंगराव नलवडे, महिपती जाधव, बजरंग सूर्यवंशी, जगदीश मोहोळकर, कृष्णा इदाटे, लालासाहेब संकपाळ, शिवप्रसाद शिंदे, रमेश राजमाने, चंद्रकांत गोंदील, जनसंपर्क अधिकारी सुहास पुदाले आदी उपस्थित होते.

020921\img-20210831-wa0031.jpg

पलूस बँक

Web Title: Palus Co-operative Bank pays 14% dividend to its members