शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात झाली ४५० आंदोलने

By admin | Updated: December 19, 2014 00:21 IST

उमेदवारांना प्रचारासाठी अस्त्र मिळाले

सांगली : गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुमारे साडेचारशे आंदोलने झाली. आंदोलनांमध्ये सामाजिकबरोबर राजकीय आंदोलनांचा सहभाग अधिक होता. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची कसरतही जिल्हा प्रशासनाला करावी लागली. लोकसभा निवडणुका मे महिन्यात झाल्या असल्या तरी, त्याची चर्चा जानेवारीपासून सुरू होती. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा जूनमध्येच सुरू झाली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला कोंडीत पकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक आंदोलने झाली. आरक्षण, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा निर्मूलन, पुनर्वसन, जवखेडे हत्याकांड अशा विविध कारणांनी आंदोलने झाली. मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे, धरणे आंदोलने झाली. मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले, मात्र धनगर, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा निर्णय झाला नाही. मराठा, मुस्लिम समाजाचे आरक्षण न्यायालयात रखडल्यामुळे पुन्हा यासाठी आंदोलने झाली.महापालिका क्षेत्रातील सोयी-सुविधांसाठीही आंदोलने झाली. निवडणुकीमुळे अनेक पक्ष, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिलपासूनच आचारसंहिता लागू झाली. यामुळे सर्व कारभार प्रशासनाच्या हाती आला. आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीची सभा चार महिने होऊ शकली नाही. यामुळे विकासकामे रखडली. जिल्हा प्रशासनाचा तीन महिन्यांचा कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आणि त्या सुरळीत पार पाडण्यासाठी गेला. महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. यामुळे पुन्हा एकदा महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली. निवडणुका सुरळीत पार पडल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. यामध्ये पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य प्रशासनाला मिळाले. आजपर्यंत पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी विविध समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या. आढावा बैठका थांबल्याने पुन्हा एकदा विकास कामांना खीळ बसली. संजय गांधी निराधार योजना, नियोजन समिती सभा, ग्राहक परिषद सदस्यांच्या नेमणुका थांबल्या. पावसाने दिला दिलासायावर्षी पावसाअभावी जून, जुलै कोरडा गेल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अगदी आॅगस्टपर्यंत सांगली जिल्ह्याला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली. आॅगस्टपासून मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आणि चित्र पालटले.उमेदवारांना प्रचारासाठी अस्त्र मिळालेलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यावर्षी झाल्याने या निवडणुकीत विविध समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे प्रभावी अस्त्र राजकीय कार्यकर्त्यांना मिळाले. मराठा, धनगर, कोळी, लिंगायत, नंदीबैलवाले आदी समाजाच्या आरक्षणासाठी यावर्षी मोठ्याप्रमाणात आंदोलने झाली. याला सत्तारूढ गटाबरोबर विरोधी पक्षांनीही पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. अंजर अथणीकर