शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह उभारण्यास कवलापूरकरांचा विरोध

By admin | Updated: August 12, 2015 23:25 IST

पोलीस ठाणे सुरू करा : प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयासही हरकत नाही

बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या जागेवर जिल्हा कारागृह उभारण्यास कवलापूरमधील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. कारागृहाऐवजी येथे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय व इतर कार्यालये उभारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत ठराव करण्यात येणार आहे.सरपंच प्रकाश माळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भानुदास पाटील, वसंतदादा साखर कारखाना संचालक निवासबापू पाटील, माजी सरपंच विजय पाटील आदींनी याबाबतची भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक बनलेले सांगलीतील जिल्हा कारागृह कवलापूर येथील विमानतळावरील जागेत हलविण्याचा विचार राज्याच्या कारागृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी मागील आठवड्यात सांगली दौऱ्यात व्यक्त केला होता. कारागृहासाठी कवलापूर विमानतळावरील दहा एकर जागा वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.मात्र मीरा बोरवणकर यांच्या या निर्णयाला कवलापूरमधील लोकप्रतिनिधी अािण ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यावेळी राजेंद्र माळी, सुभाष जाधव, प्रमोद पाटील, अनिल खाडे, संजय तोडकर, जयंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)उद्योग उभारणीच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षकवलापूर विमानतळाची सुमारे १५० एकर जागा सध्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. विमानतळ उभारणीचे अनेक नारळ फुटूनही अपुऱ्या जागेमुळे विमानतळ उभारणीचा प्रयत्नच सोडून द्यावा लागला आहे. स्थानिक तरूणांना नोकरी - उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे एम. आय. डी. सी. उभारण्याची मागणीही स्थानिकांनी वारंवार शासनाकडे केली. परंतु, याकडे राज्यकर्त्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.