अस्थीविसर्जन कार्यक्रमात जयंत पाटलांना अश्रू अनावर, सहकाऱ्याच्या आठवणीने भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 15:37 IST2020-10-18T15:36:10+5:302020-10-18T15:37:12+5:30

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला

Only those who have taken me this far are escaping from my hands, Jayant Patil is in tears | अस्थीविसर्जन कार्यक्रमात जयंत पाटलांना अश्रू अनावर, सहकाऱ्याच्या आठवणीने भावुक

अस्थीविसर्जन कार्यक्रमात जयंत पाटलांना अश्रू अनावर, सहकाऱ्याच्या आठवणीने भावुक

ठळक मुद्देराजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला.

सांगली - आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील हे भावूक झाले, त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचे दिसून आलं. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी जवळच्या लोकांचे अकाली निधन झाल्यामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना गहिवरूनही आले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र, तीच लोकं आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंत पाटील यांनी या कालखंडात गमावले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांमध्ये वावरणारा नेता म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे. आपल्या जवळच्या माणसांचे अशारीतीने जाण्यामुळे जयंत पाटील यांना मोठे दुःख झाले आहे आणि तेच आजच्या कार्यक्रमात अनुभवायला मिळाले.
 

Web Title: Only those who have taken me this far are escaping from my hands, Jayant Patil is in tears