शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आळसंद तलावाच्या पाहणीचा केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद ...

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने आदेश देऊन तलावात पाणी सोडण्याची सूचना केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर काही लोकांनी उगाचच आळसंद तलावाची पाहणी केल्याचा केवळ फार्स केला असल्याची टीका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता केली.

विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार-पाच दिवसानंतर एकदा नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी आमदार अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्याशी चर्चा करून आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडण्याची सूचना केली होती.

या पार्श्वभूमीवर वैभव पाटील म्हणाले, घोगाव व आळसंद जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, पाईपची गळती व ताकारी योजनेचे आवर्तन लांबल्याने आळसंद तलाव कोरडा पडल्यामुळे विटा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विजेची अडचण सोडवून घेतली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन विभागाला आदेश देत आळसंद तलाव भरून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे येत्या दोन दिवसात ताकारीचे पाणी आळसंद तलावात येणारच होते.

परंंतु, काही राजकीय मंडळी आळसंद तलावाची पाहणी केल्याचा फार्स करत आहेत. हे नेहमीचेच आहे. परंतु, नागरिकांनी या प्रकाराला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वैभव पाटील म्हणाले.