सांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:01 PM2018-10-31T15:01:17+5:302018-10-31T15:17:49+5:30

सांगली येथील काळ्या खणीत बुधवारी सकाळी एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. प्रकाश बाबुराव पवार (४५, रा. सुंदरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

One suspect in Sangli was found dead | सांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

सांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळलापोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

सांगली: येथील काळ्या खणीत बुधवारी सकाळी एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. प्रकाश बाबुराव पवार (४५, रा. सुंदरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सकाळी दहा वाजता नागरिकांना मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. नागरिकांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाली.

तीन ते चार दिवस मृतदेह पाण्यात असल्याने दुर्गंधी पसरली होती महापालिकेच्या अग्निशमन दल जीवरक्षक पथकाच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. वैद्यकीय पथकाने जागेवरच मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली.

मृतदेहाच्या डोक्यात पोते गुंडाळलेले होते. त्यामुळे पवार याने आत्महत्या केली की आणखी काय हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पवार हा अविवाहित होता तो सुंदरनगरमध्ये एकटाच रहात होता. त्याचा भाऊ व आई वानलेसवाडी येथे रहतात.

Web Title: One suspect in Sangli was found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.