Sangli: बिळूर येथे ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू, महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 17:55 IST2024-03-08T17:54:49+5:302024-03-08T17:55:20+5:30
दरीबडची : बिळूर (ता.जत) येथील लक्ष्मी फाटा जवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू व ...

Sangli: बिळूर येथे ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू, महिला जखमी
दरीबडची : बिळूर (ता.जत) येथील लक्ष्मी फाटा जवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू व एकजण गंभीर जखमी झाला. गुरबसू शंकर जाबगोंड (वय ५०,रा.बिळूर) असे मृताचे नाव आहे. तर सावित्री जाबगोंड (वय ५५) ही महिला गंभीर जखमी झाली. घटनास्थळावरुन चालकाने ट्रक सोडून पलायन केले. आज शुक्रवारी (दि.८) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
बिळूर येथील गुरापा जाबगोंड हे सकाळी दुचाकी क्रमांक (एमएच -०५,टी-३६०५) दुचाकीने डेअरीला दूध घालण्यासाठी गावात आले होते. दूध घालून ते घरी निघाले होते. दरम्यान ट्रक गाडी नंबर (एम एच -४३,ई-७६६८) हा सुग्रास भरुन अथणीला निघाला होता. लक्ष्मी फाटा येथे उतारा असल्याने ट्रक चालकाचा गाडीवरच ताबा सुटल्याने पुढील जाबगोंड यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकी वीस फूट फरफत गेली.
यावेळी गुरुबसु जाबगोंड ट्रकच्या चाकीखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. तर सावित्री जामगोंड या रस्त्यावर उडून पडल्या. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. सावित्री यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तराय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. जत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.