शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोहिद्दीन मुल्ला खूनप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST

सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी ...

सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. रवी हरी चंडाळे (वय ३६, रा. शिवाजी मंडई) असे संशयिताचे नाव आहे. अटकेची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण करण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मोहिद्दीन मुल्ला हा वारणानगर येथील ९ कोटी १८ लाख रुपयांच्या चोरीतील मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी १२ मार्च २०१६ मध्ये त्याच्या घरावर छापा मारून ३ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी १५ मार्च २०१६ पर्यंत तपासासाठी वारणानगर येथे छापे मारले. या छाप्यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. एकूण ९ कोटी १८ लाख रुपयांवर पोलिसांसह मुल्ला याने डल्ला मारला, अशी फिर्याद सरनोबत यांनी दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर आणि मोहिद्दीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मोहिद्दीन मुल्ला हा वर्षानंतर जामिनावर सुटला होता. तो विजयनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत जुगार क्‍लब चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु विशेष पोलीस पथकाने छापा टाकून त्याच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर मुल्ला हा क्‍लब चालवण्यासाठी सांगली शहरात जागा शोधत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलजवळील गणेशनगर, रमामातानगर परिसरात तो जागा शोधत होता. यात त्याचा संशयित हल्लेखोरांशी आर्थिक कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी रवी चंडाळे या संशयितावर रविवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटकेची कारवाई केली. अन्य संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.