शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेवरून जुने पदाधिकारी धारेवर

By admin | Updated: November 27, 2015 00:01 IST

भिलवडी ग्रामसभा : रखडलेल्या पाणी योजनेचा लेखाजोखा देण्याची मागणी

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच ग्रामसभेत दोन कोटी रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाणी योजनेचे काम अपुरे ठेवल्याबद्दल व ते रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध नसल्याच्या कारणावरून ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांसह माजी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांनी, सभा सुरू असताना ग्रामविकास अधिकारी पवार हे विसंगत उत्तरे देत असताना माजी सरपंच राहुल कांबळे यांना बोलावण्यात आले. दोन कोटीची पाणी योजना अपुरी ठेवल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे, या योजनेचा लेखाजोखा तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.या बैठकीवेळी राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी, पदाधिकारी हे गावाचे सेवक असून सर्वसमावेशक विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. सदस्य धनंजय पाटील यांनी, एकूण महसुलाच्या १५ टक्के निधी हा भिलवडीतील दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी, बाजार मैदानात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी केली. तंटामुक्त अभियान समिती, आरोग्य समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती या सर्व समित्या बरखास्त करणे, कृष्णा नदीपात्रामध्ये वाळू उपसा बंदी, गावकामगार तलाठ्यांची बदली करणे, गंजीखान्यातील प्लॉटला नगररचना खात्याकडून बांधकाम परवाना मिळविणे, उसाला एफ. आर. पी. प्रमाणे एकरकमी बिल देण्याच्या मागणीच्या ठरावाबरोबरच विविध ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रारंभी सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मन्सूर मुल्ला, महावीर चौगुले, सतीश चौगुले, श्रीकांत निकम, तानाजी भोई, विजय पाटील, गिरीश वाळवेकर, चंद्रकांत केंगार आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)४ डिसेंबरला लेखाजोखा : अनेकांकडून असहकार्य राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.