शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 14:17 IST

सांगलीत ओबीसींची संवाद बैठक संपन्न

सांगली : आगामी निवडणुकीत ओबीसी समाज हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. प्रत्येक पक्षांने ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी. त्या मिळालेल्या संधीचं विजयात रूपांतर करून ओबीसी बांधव संधीच सोने करतील.संधी नाही मिळाल्यास ओबीसींनी कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवलं असून त्याची यादी फिक्स असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सांगलीतील हरिप्रिया मंगल कार्यालयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसीची संवाद बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.हाके पुढे म्हणाले की, यावेळी पहिल्यांदा ओबीसी, एससी एसटी आणि अल्पसंख्यांकांना मतदान करेल. काँग्रेसचे देशाचे नेते राहूल गांधी ओबीसींची जात निहाय जनगणना करावी असं म्हणतात आणि त्यांचेच नेते महाराष्ट्रात एक ब्र शब्दही बोलायला तयार नाहीत. यावेळी ओबीसी समन्वयक संजय विभुते, समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने, समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत ,माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सविता मदने, कल्पना कोळेकर, वर्षा निंबाळकर,माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ,विठ्ठल खोत,सुनील गुरव, जगन्नाथ माळी, संग्राम माने, नंदु निळकंठ आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते.दुटप्पी नेत्यांबद्दल राहुल गांधी यांच्याशी बोलणारहाके म्हणाले, दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविषयी तसेच त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलत काँग्रेस कशी संपवली, याविषयी पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत आपण कोणताही आडपडदा न ठेवता बोलणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीOBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024