शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या अटी जाचकच

By admin | Updated: July 10, 2016 01:38 IST

शंकर पुजारी : १७ जुलैला कर्मचाऱ्यांचा मेळावा

सांगली : राज्यात गेल्या १२ वर्षांपासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मानधन वाढविण्याची मागणी होत असताना, शासनाने उलट अन्याय करत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली (सेंट्रल किचन) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या राज्यातील १ लाख ८० हजार, तर जिल्ह्यातील सहा हजारावर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा रविवार, दि. १७ जुलैला मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य उपाध्यक्ष शंकर पुजारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पुजारी यांनी सांगितले की, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहार शिजविण्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून कर्मचारी अत्यंत तोकड्या मानधनावर करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सध्या महिन्याला एक हजार रुपये मानधन देऊन शासनही त्यांची पिळवणूक करत आहे. या कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देण्यात यावे, यासाठी राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी त्यांना ७ हजार ५०० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शासनाने शैक्षणिक वर्षात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली (सेंट्रल किचन) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. पोषण आहारातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, कामावरून कमी करण्यात येऊ नये, मानधनात वाढ करण्यात यावी आदींसह इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. १७ जुलैला इंदिरानगर येथील सावंत प्लॉट येथे कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यास कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)