शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थी संख्येला कात्री

By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST

एमबीबीएसवर टांगती तलवार : मिरज महाविद्यालयाच्या दहा जागा कमी

मिरज : शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्याने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागाच्या दहा जागा यावर्षी कमी झाल्या आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स कमी झाल्याने सांगली-मिरजेतील सिव्हिलमध्ये रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. एमबीबीएसच्या दीडशे विद्यार्थ्यांच्या मान्यतेवरही मेडिकल कौन्सिलची टांगती तलवार आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे १५० विद्यार्थी व ४५ पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींच्या जागा होत्या. मात्र महाविद्यालयात अध्यापकांच्या रिक्त जागा, रक्तपेढी, शैक्षणिक सभागृहासह अन्य सुविधा नसल्याने पदव्युत्तर विभागाच्या ४५ पैकी १० जागा चालूवर्षी जूनपासून कमी करण्यात आल्या आहेत. स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिव्यंग, औषध विज्ञानशास्त्र, फिजिआॅलॉजी या विभागातील दहा जागा कमी झाल्या आहेत. सांगली, मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या सुमारे पाचशे रुग्णांवर पदव्युत्तर शिक्षण घेणारे निवासी डॉक्टर उपचार करतात. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने सांगली, मिरज सिव्हिलच्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी तीन वर्षे हॉस्पिटलच्या सेवेत असल्याने वरिष्ठ डॉक्टरावरील रुग्णांचा भार कमी होतो. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात १९८० पासून ५५ पदव्युत्तर जागा होत्या. शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्याने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी ही संख्या ३५ वर आली आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खासगी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी व पदविका घेण्यासाठी २५ ते ५० लाख रुपये खर्च येतो. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांची सुमारे ३० पदे रिक्त आहेत. गतवर्षी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या तपासणीत अध्यापकांची रिक्त पदे, रुग्णालयासाठी रक्तपेढी व अन्य शैक्षणिक सुविधा नसल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. एका वर्षात सुविधांची पूर्तता करण्याच्या अटीवर एमबीबीएसच्या दीडशे विद्यार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे. पदव्युत्तर विभागातील दहा जागा यावर्षी जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या पुढील तपासणीपर्यंत १५० विद्यार्थ्यांच्या मान्यतेवरही टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)सार्वजनिक बांधकामकडून चालढकलमहाविद्यालयातील अध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकल सुरू असल्याने रक्तपेढीच्या बांधकामासाठी विलंब झाला आहे. मात्र रक्तपेढीसह इतर शैक्षणिक सुविधांची पूर्तता करून पदव्युत्तर विभागाच्या जागा पूर्ववत मिळविण्यात येतील, असे अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोंणगावकर यांनी सांगितले.