शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

एरिया सभेसाठी राज्य शासनाला नोटीस

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

आयुक्तांच्या या भूमिकेमुळे नगरसेवकांचे नगरसेवकपदच गमवावे लागणार आहे. समितीने शासनालाच कायदेशीर कारवाईपूर्व नोटीस पाठविली आहे.

संजयनगर : महापालिका कायद्यातील एरिया सभेच्या तरतुदीची अंमलबजावणी न केल्याबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव व नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांना कायदेशीर कारवाईची नोटीस दिली आहे. या नोटिसीमध्ये एरिया सभा न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि दोन वर्षात चार एरिया सभा न घेणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करावे अन्यथा शासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, मुनीर मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महापालिका क्षेत्रामध्ये किमान सहा महिन्यातून एरिया सभा घेणे बंधनकारक आहे. परंतु सांगली महापालिकेसह महाराष्ट्रातील एकाही महापालिकेने एरिया सभा घेतल्या नाहीत. सुधार समितीतर्फे सांगली महापालिकेसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, पुणे-पिंपरी-चिंचवड, अहमदनगर एरिया सभा सुरू करण्यासंदर्भात कायदेशर कारवाईपूर्व नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आयुक्तांनी एरिया सभा सुरु करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे नगरसेवकांचे नगरसेवकपदच गमवावे लागणार आहे. समितीने शासनालाच कायदेशीर कारवाईपूर्व नोटीस पाठविली आहे. यावेळी प्रा. आर. बी. शिंदे म्हणाले, एरिया सभा हे समस्या सोडवण्यासाठीचे हक्काचे ठिकाण आहे. यामुळे कर वसुलीसही मदत होईल. एरिया सभा हा अधिकार आहे. एरिया सभा न घेणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे. याप्रसंगी शंकर माळी, जयवंत जाधव, सुधाकर पाटील, अनिल नलवडे, अनिता पाटील, अरुणा शिंदे, राणी यादव, उपस्थित होते. (वार्ताहर)