बुधगावात खौकीधारकांना ग्रामपंचायतीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:36+5:302021-09-25T04:27:36+5:30

बुधगावात सांगली-विटा राज्य मार्गाबरोबरच गावातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये छोटी-मोठी खोकी उभारण्यात आली आहेत. यातील काही खोकी ही वापरातील ...

Notice of Gram Panchayat to khauki holders in Budhgaon | बुधगावात खौकीधारकांना ग्रामपंचायतीच्या नोटिसा

बुधगावात खौकीधारकांना ग्रामपंचायतीच्या नोटिसा

बुधगावात सांगली-विटा राज्य मार्गाबरोबरच गावातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये छोटी-मोठी खोकी उभारण्यात आली आहेत. यातील काही खोकी ही वापरातील स्वच्छतागृहे पाडून गटारींवर उभारण्यात आली आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख सतीश खांबे यांनी बाळासाहेब ठाकरे चौकातील अशाच एका गटारीवरील खौक्याला विरोध केला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी खोकीधारकाला सहायकारी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख सतीश खांबे, जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरु झाली आहे. डुडी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्यास, त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

डुडी यांच्या या आदेशाने गावातील सामान्य खोकीधारकांवर अन्याय होणार असून, आम्ही खोकीधारकांच्यावतीने प्रसंगी न्यायालयात जाऊ असे म्हटले आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण पाटील, माजी उपसरपंच प्रशांत मोहिते, कुलदिप पाटील, अविनाश पाटील आदींनी अशा आशयाचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

चौकट

कोणाला काहीच खंत नाही

गावात ग्रामपंचायतीच्यावतीने नाक्यावर चावडीसमोर, महादेव मंदीराशेजारी आणि स्टॅंड चौकात राजवााडा रस्त्यावर अशा तीन ठिकाणी पुरुषांसाठीची स्वच्छतागृहे उभारली होत्या. ही स्चच्छतागृहे पाडून खोकी उभारण्यात आली आहेत. आता स्टॅडवरील एक नंबर शाळेचे पटांगण आणि ग्रामपंचायतीच्या स्चच्छतागृहाचा अनिच्छेने वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याला ग्रामपंचायतच जबाबदार आहे. मात्र याचे गांभीर्य कोणालाच नसल्याचे दिसते.

Web Title: Notice of Gram Panchayat to khauki holders in Budhgaon