शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

डफळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 3:28 PM

डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.

ठळक मुद्देडफळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

सांगली : डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.मिरजेला जाताना संबंधित महिलेची डफळापूरच्या बसथांब्यावरच प्रसूती झाली होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई का करू नये, अशी विचारणाही डॉ. चोथे यांच्याकडे करण्यात आली आहे.डफळापूरपासून दहा किलोमीटरवरील खेड्यात राहणाऱ्या महिलेस सोमवारी प्रसूती कळा सुरू होत्या. सकाळी अकराच्या सुमारास ती पती व लहान मुलासोबत डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. दरम्यान, तिची अवस्था पाहून परिचारिकेने केसपेपर काढून दिला. केसपेपर घेऊन ती गर्दीतून वाट काढत डॉ. अभिजित चोथे यांच्या केबिनमध्ये गेली.चोथे यांनी तिची तपासणी करून इथे प्रसूती करता येणार नाही, तुम्ही मिरजेला जा, असा सल्ला दिला. रुग्णालयाची गाडी पंधरा दिवसांपासून बंद आहे, असे सांगून तिला मिरजेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी टाळण्यात आली.

संबंधित महिला पायीच बसथांब्याकडे गेली. तेथे ती बसची वाट बघत प्रसूतीकळा सहन करीत बसून होती. तासाभरानंतर वेदना असह्य झाल्याने ती ओरडू लागली. तिची अवस्था पाहून बरोबर असलेला मुलगाही आरडाओरड करू लागला.

पती बसथांब्यावर फिरू लागला. हा गोंधळ ऐकून बघ्यांची गर्दी वाढली. काही महिला मदतीसाठी पुढे सरसावल्या. गर्दीत एक परिचारिकाही होती. तिने पुढाकार घेतला आणि या गर्दीतच संबंधित महिला प्रसूत होऊन जुळी मुले जन्माला आली.काहीं वेळानंतर रुग्णवाहिका बसथांब्यावर आली. यानंतर पुन्हा संबंधित महिलेला डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. डॉ. चोथे यांनी वेळेत योग्य सल्ला व सेवा दिला नाही.संबंधित महिलेच्या जिवावर बेतण्याची वेळ आली. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉ. चोथे यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे डॉ. गिरीगोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरSangliसांगली