शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हप्ते वसुलीप्रकरणी दोघांना नोटिसा

By admin | Updated: September 4, 2015 22:38 IST

तहसीलदारांची कारवाई : नायब तहसीलदार, चालक अडचणीत

इस्लामपूर : शिये (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वाळू वाहतूकदार कृष्णात धोंडिराम वरुटे यांच्याकडून पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून येथील निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व तहसीलदारांच्या गाडीचे चालक वैभव चमकले यांना तहसीलदार सौ. रुपाली सरनोबत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. कृष्णात वरुटे यांनी वाळू वाहतुकीचा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे. ३१ आॅगस्टरोजी रात्री बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येलूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व वाहनचालक वैभव चमकले यांनी ७0 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुसऱ्याकडून पैसे घेऊन १0 हजार रुपये दोघांना दिले. मात्र जादा पैशाच्या लालसेपोटी त्यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. जादा पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी ट्रकसह पोलीस ठाण्यात आणले. खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, असे वरुटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या प्रकाराविरोधात वरुटे यांनी दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर संबंधित दोघे कोणाच्या आदेशावरुन कारवाईसाठी महामार्गावर गेले, याची सखोल चौकशी तहसीलदारांनी करावी असे आदेश देशमुख यांनी दिले. तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कसलीही परवानगी न घेता विपीन लोकरे व चालक वैभव चमकले यांनी शासकीय गाडी वापरुन वाळू वाहतूकदारांवर कारवाई का केली, याबाबत दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या दिवशी आपण प्रशिक्षणासाठी बाहेरगावी होतो. (प्रतिनिधी)वाळू वाहतूकदार कृष्णात वरुटे यांच्याकडून पैशांची मागणीजादा पैशाच्या लालसेने वाहनांचा पाठलागपैसे देण्यास नकार दिल्याने ट्रकसह पोलीस ठाणे गाठलेतक्रार देण्याची दिली धमकी