शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, तर कोरोनाच्या प्रसारासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:50 AM

CoronaVirus St Sangli : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत.

ठळक मुद्देएसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, तर कोरोनाच्या प्रसारासाठी!

संतोष भिसे सांगली : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत.सांगली आगारातून सुटणार्या महत्वाच्या मार्गांवरील गाड्यांमध्ये प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत आहेत. परस्परांना खेटून उभ्या राहणार्या प्रवाशांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भिती आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. सक्तीचे लॉकडाऊन लादून लोकांना घरी बसविले आहे. पोटापाण्याचे रोजगार व व्यवसाय बुडवून लोक घरी बसलेत. एसटीला मात्र याच्याशी कोणतेही देणेघेणे नसावे अशी स्थिती आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत पन्नास टक्के क्षमतेसह वाहतूकीला परवानगी होती. सध्याच्या दुसर्या लाटेत मात्र तसे स्पष्ट आदेश नाहीत. प्रवाशांना उभे राहून प्रवासाला मात्र परवानगी नाही. सांगली आगारातील चित्र नेमके याच्या उलटे आहे. शनिवारी सकाळी ८.५५ वाजता सांगली स्थानकातून कोल्हापुरसाठी सुटलेल्या एसटीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.

प्रवाशी परस्परांच्या अंगावर रेलून उभे होते. अशाच गर्दीत वाहक तिकिटे देण्याचे काम करत होता. प्रवाशांनी मास्क लावले असले तरी सोशल डिस्टन्सींगचा पत्ता नव्हता. इचलकरंजी, सोलापूर या मार्गांवरील गाड्यांमध्येही प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. अतिरिक्त प्रवाशांना रोखण्याची जबाबदारी वाहकाची आहे, पण उत्पन्नाच्या नावाखाली त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. काही सजग प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रवाशांची वाहकावरच दादागिरीएसटीच्या अधिकार्यांनी दावा केली की, सांगली-कोल्हापूर व सांगली-इचलकरंजी मार्गांवर गाड्यांची संख्या कमी केली आहे. यापूर्वी पाच-दहा मिनिटांना गाडी सुटायची, सध्या अर्ध्या तासांना एक गाडी सोडली जाते, त्यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. ते वाहकाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. वाहकावरच दादागिरी करतात. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी गाड्यांची संख्या वाढविण्याची मानसिकता अधिकार्यांत दिसत नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीSangliसांगली