शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेसाठी अखेर महापालिका झाली जागी

By admin | Updated: September 3, 2015 23:35 IST

दोनशे कोटींचा प्रस्ताव : शनिवारी शासनाकडे सादर करणार

सांगली : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीत पात्र ठरू न शकलेल्या सांगली महापालिकेने आता अमृत योजनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेली महिनाभर केवळ अमृत योजनेची चर्चाच प्रशासन स्तरावर झाली. अखेर नगरविकास खात्यातून दूरध्वनी आल्यानंतर गुरुवारी प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. शनिवार दि. ५ सप्टेंबरपर्यंत अमृत योजनेसाठी कृती आराखडा सादर करावा लागणार असल्याने अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार दोनशे ते अडीचशे कोटीचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र शासनाच्या अमृत योजनेत सांगली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील इतर महापालिकांनी अमृत योजनेसाठी पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असताना, सांगलीत मात्र याबाबत शांतता होती. गुरुवारी नगरविकास खात्यातून महापालिकेला दूरध्वनी आला. शनिवारपर्यंत कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर गटनेते किशोर जामदार यांनी महापौर विवेक कांबळे यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. दुपारनंतर पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्याने, आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. (प्रतिनिधी)जुनेच प्रस्ताव नव्याने होणार सादर...योजनेत सध्याच्या अपूर्ण पाणी, ड्रेनेज योजनेसाठी निधीची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय उद्याने विकास, पावसाळी पाण्याचा निचरा आदी गोष्टींसाठी आराखडा तयार केला जाईल. एकूण पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करून निधीची मागणी होणार आहे. महापालिकेने दोनशे ते अडीचशे कोटीचा आराखडा तयार करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत जुनेच प्रस्ताव नव्याने सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.