शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथक पुन्हा कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST

सांगली : शाळा, कॉलेजसह सार्वजनिक ठिकाणी तरुणी व महिलांना होणारा रोडरोमिओंचा त्रास कमी करण्यासाठी पुन्हा एकदा निर्भया पथक कार्यन्वित ...

सांगली : शाळा, कॉलेजसह सार्वजनिक ठिकाणी तरुणी व महिलांना होणारा रोडरोमिओंचा त्रास कमी करण्यासाठी पुन्हा एकदा निर्भया पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यावेळी पोलिसांना असलेल्या वाढीव बंदोबस्तामुळे निर्भया पथकाचे काम थांबले होते. आता पुन्हा एकदा काम सुरू झाले असून जिल्ह्यात सात पथकांद्वारे हे कामकाज चालणार आहे.

कोरोनाचा संसर्ग आवाक्यात येत असल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पोलीस दलाच्या उपक्रमांनाही सुरुवात केली आहे. त्यानुसार गेल्या दहा महिन्यांपासून थांबलेले निर्भया पथकाचे काम पुन्हा सुरू झाले आहे.

शाळा, महाविद्यालये, क्लासेस आदी ठिकाणी मुलींना तरुणांकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे निर्भया पथक आता साध्या वेशात या भागात आपली गस्त वाढवत हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करणार आहे.

सांगली शहरात एक पथक कार्यरत असणार आहे, तर इतर जिल्हाभरात असलेल्या निर्भया पथकाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांच्यावर आहे. एका पथकात दोन पुरुष कर्मचारी, तीन महिला पोलीस कर्मचारी तर एक अधिकारी असणार आहे. सोमवार, दि. १५ पासून बऱ्याच कालावधीनंतर जिल्ह्यातील महाविद्यालयेही सुरू होणार आहेत. त्यामुळे कॉलेज परिसरासह गर्दीच्या ठिकाणी हे पथक कार्यरत असणार आहे.

मुलींना त्रास देण्यासह हुल्लडबाजी करताना अल्पवयीन तरुण आढळून आला तर त्याच्या पालकाला बोलावून थेट समज देण्यात येणार आहे तर इतर तरुणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. साध्या वेशातील कर्मचारी या पथकात असल्याने कारवाई करणे सोपे होणार आहे.

कोट

शहरात निर्भया पथकाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तरुणी, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर याद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. कुणाकडून त्रास होत असल्याची तरुणींनीही तक्रार दिल्यास त्यावरही निर्भया पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.

-अजित टिके, पोलीस उपाधीक्षक, सांगली