शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नेट बॅँकिंग फसवणूक; महिलेस अटक--आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी पलूसला जेरबंद

By admin | Updated: October 2, 2014 00:10 IST

शेतात अर्भक पुरले; प्रेमीयुगुलास अटक

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील शुक्रवार पेठेतील महिला व्यापारी सुश्मिता खाटक यांच्या बँक खात्यातून ११ लाख १५ हजार रुपये नेट बँकिंगद्वारे लंपास केल्याप्रकरणी रोशन आरा खान (वय ३२, रा. पश्चिम बंगाल) या महिलेस अटक करण्यात आली असून, तिला आज (बुधवार) न्यायालयासमोर हजर केले असता, सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, ती पोलिसांना तपास कामात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुश्मिता खाटक यांच्या नेट बँकिंगचा पासवर्ड मिळवून त्यांच्या खात्यावरून ११ लाख १५ हजार रुपये चोरट्यांनी परस्पर काढले होते; मात्र त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्याने त्यांना बँकेतून रक्कम काढल्याचा संदेश मोबाईलवर आला नाही. त्यामुळे त्यांनाही हा घडलेला प्रकार समजला नाही. मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकेतून रक्कम काढल्याचा संदेश त्यांना आला. खाटक यांच्या बँक खात्यावरून रक्कम कोणाच्या नावावर व कोणत्या बँकेत हस्तांतर झाली, याचा शोध पोलिसांनी घेतला. त्यावेळी रोशन खान या महिलेचे नाव निष्पन्न झाले होते. तिने मुंबईतील खारघर येथील एका एटीएममधून चार लाख रुपये काढले होते. रोशन खान हिला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून तिला विश्रामबाग पोलिसांनी आज ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी पलूसला जेरबंदपलूस : झारखंड राज्यातील सातजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीस पलूस पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. महंमद फरजून महंमद सिकंदर शेख (वय २१), (रा. यदुलीतुल्ला, ता. राधानगर, जि. साहेबगंज) शेख महंमद इम्तियाज शेख (२६, रा. पियारपूर, ता. राधानगर), इम्रान बरकत अलीशेख, (१९, रा. पिहारपूर) आसरू सलीम शेख (४२), मेहबूब मजबूर रेहमान आलम (२७), बाहरून मजबूल शेख (२७), कामू मांजारुल शेख (२६, सर्व रा. किनवागडखी, ता. रांगा, जि. साहेबगंज, झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफ बाजार व रामानंदनगर भागामध्ये या दरोडेखोरांची टोळी सक्रिय होती. (वार्ताहर)सुंदरनगरमधील घटना : एकाच बंगल्यात दुसऱ्यांदा चोरीमिरजेत बंगला फोडून ऐवज लंपासशेतात अर्भक पुरले; प्रेमीयुगुलास अटकआटपाडी : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे प्रेमसंबंधातून अपत्य झाल्यावर ते शेतात टाकून देणाऱ्या कुमारी मातेस आणि धनाजी सुखदेव गळवे (वय २३) या प्रेमवीरास आज सायंकाळी आटपाडी पोलिसांनी अटक केली.धनाजी हा इयत्ता १0 वी पर्यंत शिकला आहे, तर या प्रकरणातील युवतीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यातून आलेल्या शरीरसंबंधातून युवती गरोदर राहिली. याची कुणकुण लागताच धनाजी याने तिच्याशी संबंध तोडले. मात्र ही युवती घरीच होती. या प्रकरणातून सुटण्यासाठी धनाजीने दि. २८ सप्टेंबर रोजी गर्भपाताच्या गोळ्या आणून त्या एका मित्रामार्फत या युवतीपर्यंत पोहोचविल्या. गोळ्यांचे सेवन करताच दि. २९ सप्टेंबर रोजी पहाटे ही युवती प्रसूत झाली व मुलगा झाला. मात्र बदनामीच्या भीतीने या अर्भकाला शेतात एक खड्डा खणून तिथे टाकले होते. सध्या या बाळास सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी उपचारार्थ दाखल केले आहे. त्याची प्रकृती चांगली आहे. आज संबंधित युवती आणि धनाजी गळवे याला आटपाडी पोलिसांनी अटक केली. (वार्ताहर)