शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

तासगावमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा

By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST

पोटनिवडणुकीबाबत चर्चा होणार

तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) तासगावात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे सर्वांचे ल्
ाक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याने, त्यांच्या भूमिकेकडेही मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.आर. आर. आबांच्या निधनामुळे, आता कोणाला संधी, याबाबत मतदारसंघात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नुकताच पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाल्याने आर. आर. पाटील यांच्या घरातून उमेदवार कोण? निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हाच विषय चर्चिला जात आहे. अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीत पाटील यांच्या घरातील उमेदवार आणि निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदारी हाच मुख्य विषय असणार आहे. राष्ट्रवादीत वरिष्ठ स्तरावर झालेले निर्णय, भविष्यातील वाटचाल अशा वेगवेगळ्या मुद्यांवर या मेळाव्यात चर्चा होणे अपेक्षित आहे. दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमुखांशी संवाद साधून, नंतर मेळावा होणार आहे. या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीबाबत धोरणात्मक निर्णय होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

संयुक्त मेळावा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी आणि निवडणुकीत पक्षसंघटनेची जबाबदारी, या मुख्य विषयांच्या अनुषंगाने उद्या तासगावात तासगाव, कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे.